Young Woman Raped in Tadoba Wildlife Resort : ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये घडली धक्कादायक घटना!|Marathi News.

News@Crime....

   Chandrapur : येथील एका मुलीला कामाच्या बहाण्याने 'ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्ट'मध्ये नेण्यात आले.तिला जबरदस्तीने कॉफीमध्ये नशीली पदार्थ टाकून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.अशी तक्रार पीडितेने रामनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.या घटनेत 3 आरोपींची नावे समोर आली आहेत.ज्यामध्ये मुख्तार शाह, नुरानी अहमद गुलाम नबी आणि मुख्तार गुलाम नबी यांचा समावेश आहे.

     पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 18 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्तार शाहने आपल्या पत्नीला पीडितेकडे काही काम आहे.असे सांगून तिला घरातून नेले.पण,वाटेत पीडितेला घरी नेण्याऐवजी तो तिला चक्क ‘ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्ट’ मध्ये घेऊन गेला.तिला ‘ताडोबा वाइल्ड रिसॉर्ट’ मधील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ताडोबा वाइल्ड रिसॉर्टमधील वेटरने आणलेल्या 2 कॉफी पैकी पीडितेच्या कॉफीमध्ये काही मादक पदार्थ मिसळण्यात आले.ते तिला देण्यात आले आणि नंतर तिचे शारीरिक शोषण करण्यात आले.यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अशी माहिती पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत सांगीतली आहे.

घटनेनंतर आरोपी नुरानी अहमद गुलाम नबी आणि त्याचा धाकटा भाऊ मुख्तार गुलाम नबी,यांनी पीडितेला धमकी दिली की,ती कोणालाही काहीही सांगू नये.भीतीपोटी, पीडितेने सदर घटना लपवली.परंतू,सततच्या धमक्यांमुळे शेवटी तिने तिच्या पालकांना सर्व काही सांगण्याचे धाडस केले आणि त्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.पोलिसांनी भारतीय दंड संहिता,2023 च्या कलम 64,115 (2),351(4)आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असल्याचे कळते.पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

#Young Woman Raped in Tadoba Wildlife Resort...

                                       ----------//----------