Bramhapuri : मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना 13 एप्रिल रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातून समोर आली आहे.विनायक विठोबा जांभुळे असे वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून चिचखेडा ते मेंडकी कक्ष क्रं.1003,मुख्य रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने मोहफुले वेचत असताना विनायकवर हल्ला केला.त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.तो घरी परत न आल्याने कुटुंबीय त्याच्या शोधात निघाले.दरम्यान त्याचा मृतदेहच सापडला.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
सुत्रांच्या माहितीनुसार,सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात मानवावर वन्यजीवांचे हल्ले वाढत असल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील मानवी जीवन भयभीत झाल्याचे चित्र आहे. शेतात जाणे जोखमीचे बनले असून शेतकऱ्यांमध्ये व गुराख्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.वन्यजीव व मानव संघर्ष दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.काल बिबट्याने नांदगाव जानी येथील तीन लोकांना जखमी केला.4 एप्रिल रोजी आवळगांव येथील मनोहर चौधरी यांची घटना ताजी असतानांच ही दुसरी घटना समोर आली आहे.वन्यजीव मानव संघर्ष कसा थांबविता येईल? आणि वाघाचे हल्ले कसे थांबवता येईल? यावर उपाययोजना तसेच जनजागृती करणे आवश्यक झाल्याचे बोलले जात आहे.
#Bramhapuri...
#Tiger Attack News...