Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा!|Marathi News.

News@Crime...

     Gadchandur : नागपूर येथे झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस राज्यभर पसरल्याचे पाहावयास मिळत आहे.हा घोटाळा साधारण 400 ते 500 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यानंतर आता भंडारा जिल्ह्यात देखील या शिक्षक भरतीची तारे पोहचली,एका मोठ्या शिक्षण संस्थेचे नाव यात समोर येत आहे.यासंदर्भात पुन्हा एकाला अटक करण्यात आली असून आरोपीचा आकडा 6 वर पोहोचला आहे.नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातून सुरू झालेल्या बोगस शिक्षक भरती व बोगस शालार्थ ID देण्याच्या प्रतापाचे लोन आता चंद्रपुरातही पोहोचल्याचे दिसत असून चंद्रपूर जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरतीत लाखोंची उलाढाल झाल्याचे आरोप होत आहेत.सावली आणि मुल तालुक्यात काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती झाल्याचा आरोप सिद्धार्थ रामटेके यांनी केला आहे.याविषयी रामटेके यांनी नागपूर विभागीय शिक्षण कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत नमूद शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर्तमान पत्रातून परस्पर पदभरतीची जाहिरात देऊन बेकादेशीर भरती केल्याचे आरोप करण्यात आले आहे.याची तक्रार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली होती.परंतू,तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याशी संगणमत करून संस्थेचा वाद न्यायप्रविष्ठ असताना सुद्धा प्रत्येकी 25 लाख रुपये घेऊन 5 शिक्षकांची बोगस भरती करण्यात आली.आणि त्यांना शालार्थ ID देऊन शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहे. 

                  'काय आहे शिक्षक भरती घोटाळा.'

बोगस शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर जिल्हापुरताच मर्यादित नसून नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्रात मोडणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या बोगस भरत्या करण्यात आल्याचे सूर सद्यस्थितीत उमटत आहे.कायम विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती केली नाही असा ठपका ठेवून अनुदान रोखण्यात आले.त्याचा तोडगा म्हणून बऱ्याच शिक्षण संस्थानी मागील काळात भरती केल्याचे दर्शवून संबंधीत कार्यालयातून अर्थिक व्यवहार करून पदभरतीला मान्यता व शालार्थ आयडी मिळवले.काही संस्था चालकांनी पदभरतीला रीतसर परवानगी न घेता परस्पर पदभरती केली.शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी मिळवली.शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा(TET)आहे.आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा(TAIT),अशा आवश्यक परीक्षा न घेता परसस्पर पदभरती करण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्या अप्पर सचिवाच्या नावाने बनावट पत्र बनवून काही पदभरती करण्यात आल्या.काही संस्थांनी ऐनवेळी अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त करून बोगस पद भरती केल्याचे आरोप केले जात आहे. 

 'चंद्रपुरातील शिक्षक भरती प्रकरणातही संशयाची सुई?'

        अपात्र असतानाही आर्थिक गैरव्यवहार करून बोगस कागदपत्रांच्या आधारे भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत मुख्याध्यापकपदावर नियुक्ती केल्याप्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षणा उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह पाचा जणांना अटक झाली.उपसंचालक नरड आणि भंडाऱ्याचे विद्यमान शिक्षणाधिकारी (मा.)संजय डोलीकर हे देखील चंद्रपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील शिक्षक भरतीबाबतही संशयाची सुई असून,चौकशी झाल्यास काही गोत्यात येऊ शकतात? अशी कुजबुज सुरू आहे.

           'चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी.' 

आता या सर्व प्रकरणात समिती नेमून कारवाई करण्यापेक्षा एसआयटी गठीत करावी.अशी मागणी नागपूरचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.या प्रकरणात चौकशी दरम्यान आणखी काय समोर येते. कोणावर आणि नेमकी काय कारवाई होते? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.शिक्षण विभागासारख्या पवित्र क्षेत्रात सदर घोटाळा होणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या हाती असते,शिक्षक आणि शिक्षण संस्थाच भ्रष्टाचारी असेल तर त्या देशाचे भविष्य कसे उज्वल होईल? याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.सदर घोटाळ्याची उच्चस्तरीय,सखोल चौकशी झाली पाहिजे,अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

#Teacher Recruitment Scam...

                                        -----------//-----------