Proud Moment Gadchandur City : या' मुलांनी केले गडचांदूर शहराचे नावलौकिक!|Marathi News.

News@Korpanalive...

 Gadchandur : येथील महाराष्ट्र वॉरियर्सच्या व्हॉलीबॉल चमूने नुकतेच भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून विजय मिळवला.यानंतर गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळविला व विजय प्राप्त करून गडचांदूर शहराचे नावलौकिक केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आमदार देवरावदादा भोंगळे,यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व 5 हजार रोख रक्कम देऊन सत्कार केला आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.      महाराष्ट्र वॉरियर्सच्या टीममध्ये आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलचे विद्यार्थी निमिष उद्धव पुरी,नैतिक नितीन कल्लेवार,सुशांत संपत रापोलू,कृणाल बाबुराव लांजे,अतुल नंदलाल चौधरी,आर्यन संजय कुलमेथे,मंथन श्रीकांत चिव्हाने,अनिरुद्ध नवनाथ मंदे,साकीब कुरेशी,हर्षित संकल्प बोबडे,प्रित मंदे,यांचा समावेश असून राष्ट्रीय स्तरावर गडचांदूर शहराचे नावलौकिक केल्याबद्दल या टीमच्या खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.कोरपना तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,उद्धव पुरी,डॉ सुभाष चुन्ने सर,व्यापारी असोसिएशन,सामाजिक संघटनांनी यांचे अभिनंदन केले आहेत.#Admirable...

#Volleyball Tournament...

#Proud Moment  Gadchandur City....

#Maharashtra Warriors Volleyball Team...

                                      ----------//----------