PRAHAR JANSHAKTI PARTY : प्रहारचे आमदारांच्या घरापुढे मशाल पेटवा आंदोलन!|Marathi News...

News@Prahar...

            Gadchandur : राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी मशाल आंदोलन जाहीर केले आहे.कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमजाव करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटविण्याचा इशारा माजी आमदार तसेच प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी 11 एप्रिल शुक्रवार रोजी रात्री 12 वाजता राज्यातील प्रत्येक आमदाराच्या घरापुढे 'मशाल आंदोलन' केले जाणार आहेत.विधानसभा निवडणुकापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान करून सत्तेत बसवले.आता मात्र अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार,यांनी येत्या 3 वर्षांत तरी कर्जमाफी शक्‍य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आवाहन केले.त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे.याची दखल घेत 'प्रहार जनशक्ती पक्षाचे' सर्वेसर्वा 'बच्चू कडू' यांनी याविरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे.              इतर ठिकाणी होणाऱ्या सदर आंदोलनाच्या श्रेणीत चंद्रपूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षचे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात आज रात्री 12 वाजता राजुरा विधानसभेचे आमदार 'देवराव दादा भोंगळे' यांच्या राजुरा येथील घरापुढे 'मशाल आंदोलन' करण्यात येणार आहेत.या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी बांधव,प्रहार दिव्यंग संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज 11एप्रिल शुक्रवार रोजी रात्री 8 वाजता राजुरा पंचायत समिती जवळ यावे.असे आव्हान जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी केले आहे.#PRAHAR JANSHAKTI PARTY...

#Mashal Andolan....

#Prahar Movement...

                                       ----------//-----------