Rajura : शेतकरी कर्जमाफी,पेरणी ते कापणीपर्यंत MRGS मधून करणे,दिव्यांग बांधवांना मासीक 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे,आदी मागण्या घेऊन 'प्रहार जनशक्ती पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष 'बच्चू कडू' यांनी पुकारलेल्या 'आमदारांच्या घरापुढे पेटवा मशाली' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा प्रहार जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर,यांच्या नेतृत्वात राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या राजुरा येथील घरापुढे 11 एप्रिल रोजी रात्री 12 वा.मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे,दिव्यांगांना 6 हजार मानधन मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे,यासह अनेक मागण्यांचे निवेदन आमदार देवरावदादा भोंगळे यांनी रात्री 12/30 वा.च्या दरम्यान स्विकारून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत 'प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू' यांनी कर्ज माफीसाठी मशाल आंदोलनाची हाक दिली होती.कर्ज माफीच्या मुद्द्यावरून घुमजाव करणाऱ्या या सरकारविरुद्ध रान पेटविण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.याचा पहिला टप्पा म्हणून 'महात्मा फुले' जयंतीदिनी रात्री 12 वाजता राज्यातील प्रत्येक आमदारांच्या घरांपुढे 'मशाल आंदोलन' करण्यात आले.या पार्श्वभूमीवर राजुरा येथे पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
सदर आंदोलनात प्रहार जिल्हाध्यक्ष सतीश बिडकरसह प्रहार कोरपना तालुकाध्यक्ष विनोद शिंदे,गडचांदूर शहराध्यक्ष सतीश शेरे,अमित यादव,ग्रामीण तालुकाध्यक्ष अमोल मांढरे,राजुरा-चंद्रपूर मतदारसंघातील प्रहार सेवकांचा समावेश होता.यावेळी हातात मशाल घेत 'जय जवान जय किसान,शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना 6 हजार मानधन मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे,अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
#Prahar Janshakti Parti...
#Rajura....
#Gadchandur....