Gadchandur : मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरे होताना आपण पाहतो.हल्लीच्या काळात वाढदिवस,हा एका सणासारखा साजरा करण्याची प्रथा समाजात रोवली आहे.सर्वसाधारण ते धनाढ्य लोक दरवर्षी आपल्या जवळच्यांचा मोठ्या उत्साहात बर्थडे साजरा करत असल्याचे दिसून येत आहेत.याच पार्श्वभूमीवर काही पोलीस मात्र,याला अपवाद ठरतात. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच्या कामांबरोबरच येणाऱ्या विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने डोळ्यात तेल घालून बंदोबस्तावर तैनात रहावे लागते.मग कशाचं वाढदिवस आणि कशाचं काय?
असाच एक प्रसंग गडचांदूर येथील एका पोलीस कर्मचारी 'रामसिंग पवार' यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुभवता आला.14 एप्रिल सोमवार रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या 134 व्या जयंती गडचांदूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली.सहकाऱ्यांसह बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी 'रामसिंग पवार' यांचा त्याचदिवशी वाढदिवस होता.सकाळची सायंकाळ झाली, पण बंदोबस्तावर आसल्याने त्यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही.
दरम्यान सांयकाळी भव्य अशी रॅली निघाली.शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत शांततापूर्ण वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते.पोलीस कर्मचारी उभे राहून लोकांना जाताना पाहत होते.एकाठिकाणी जमलेले काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून पवार यांच्या वाढदिवसबद्दल ठाणेदार शिवाजी कदम यांना माहिती मिळाली.वाढदिवसाचा दिवस संपण्याच्या मार्गावर होता. लगेच ठाणेदार कदम यांनी केक मागवून डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यासमोरील एका शितपेयच्या दुकानासमोर असलेल्या टेबलावर केक कापून पोलीस कर्मचारी 'रामसिंग पवार' यांचा वाढदिवस साजरा केला.एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे वाढदिवस? मात्र,वाढदिवसापेक्षा कर्तव्य महत्वाचे!असे यानिमित्ताने पहायला मिळाले.अशी असते पोलिसांची ड्युटी भावांनो! यांना 'एक सॅलूट तो बनता है' अशी कौतुकास्पद चर्चा यानिमित्ताने ऐकायला मिळत होती.
#Police Man....
#Gadchandur Police...