Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये अडकले चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पर्यटक!|Marathi News...

News@Terrorist Attack...

      Chandrapur : जिल्ह्यातील नागभीड तालुका येथील मिंडाळाचे सरपंच गणेश गड्डमवार व त्यांचे कुटूंब,असे 8 जण,तसेच चंद्रपूर शहरातील नगराळे,नळे व गाडीवान कुटूंबातील 7 जण,असे एकूण 15 जण काश्मीर येथे अडकून पडले आहेत.या 15 ही पर्यटकांना चंद्रपूरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.चंद्रपूर शहरातील 3 कुटुंबांतील 7 नागरिक देखील पहलगाममध्ये अडकले असून,त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे हालचालींना वेग आलेला आहे.Jammu and Kashmir Terror Attack...

दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. यंदाही काश्मीर खोर्‍यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला.त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत.यामध्ये चंद्रपूर शहरातील 3 कुटुंबांतील 7 सदस्य अडकल्याची माहिती मिळताच,आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली.यावेळी आम्ही हल्ल्याच्या ठिकाणाजवळच थांबलेलो होतो.आम्हाला चंद्रपूरला परत यायचे आहे,मात्र सध्याचे वातावरण पाहता ते शक्य नाही.

      आम्ही घाबरलो आहोत असे त्यांनी आमदार जोरगेवार यांना सांगितले.ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या.त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके आणि तसेच जम्मू-काश्मीर येथील प्रशासनाशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या कुटुंबाच्या सुटकेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली.सदर कुटुंब थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिली.

#Jammu and Kashmir Terror Attack...

#Pahalgam Terrorist Attack...

#MLA Kishor Jorgewar...

#Rehabilitation Department...

                                          ----------//----------