Rajura : तालुक्यात बल्लारपूर वेकोली(WCL)क्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहे.या कोळसा खाणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या.मात्र,प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला व नोकऱ्या देताना वेगवेगळ्या कारणाने वेकोलिने शेकडो प्रकरणे प्रलंबित ठेवलेले आहे.यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी वारंवार वेकोलि कार्यालयात चकरा मारून त्रासले आहे.हा विषय आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्या लक्षात येताच वेकोलि प्रशासनाला समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले.समस्या न सोडविल्यास वेकोलिची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा दिला.त्यामुळे वेकोलिने आ.देवराव भोंगळे यांना नागपूर येथे 19 एप्रिल रोजी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे निमंत्रण पाठविले.मात्र,आ. भोंगळे यांनी हे अमान्य करत,सदर बैठक बल्लारपूर क्षेत्राच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयातच घेण्याचे सांगितले. त्यानुसार वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल डॉ.हेमंत पांडे निदेशक कार्मिक स्वतः बल्लारपूर वेकोलि कार्यालयात आले.त्यांच्यासोबत मुख्य महाप्रबंधकाच्या उपस्थितीत आ.भोंगळे,यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह दुपारी 4 वाजता सुरु केलेली बैठक,रात्री 1 पर्यंत,सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी लवकरच समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले.रात्री आमदारांसोबत वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य महाप्रबंधक,यांनी स्वतः सास्ती गावात वेकोलिमुळे होणारे प्रदूषण व ब्लास्टिंगमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पाहणी केली व यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. वेकोलि प्रशासनाला 19 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदन प्रमाणे वेकोलिने कोळसा खाणींसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत.त्यावेळी कंपनीने शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.तथापि,जमीन अधिग्रहणाच्या अनेक वर्षांनंतरही,अनेक शेतकऱ्यांना अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.यावेळी वेकोलि प्रशासनाला स्पष्टपणे निर्देश देताना दादांनी सांगितले कि,ज्या शेतकऱ्यांची जमीन कंपनीने संपादित केली आहे.त्यांच्या सदस्यांना तात्काळ नोकऱ्या द्याव्यात.कायद्याच्या नावाखाली कुठेतरी शेतकऱ्यांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहे. बागायती जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला देऊन त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत.सास्ती, कोलगाव आणि पोवनी गावाचे पुनर्वसन,बाधित बेरोजगारांना नोकऱ्या,जड ब्लास्टिंग थांबवणे आणि शेतकऱ्यांच्या इतर गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश आ.देवराव भोंगळे यांनी बैठकीत दिले.
दिलेल्या निवेदनाप्रमाणे 21 एप्रिल सोमवार रोजी माथरा, गोवरी रोडवरील वेकोलीच्या क्षेत्रात सकाळी 10 वाजता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह आ.देवराव भोंगळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन वेकोलीची वाहतूक बंद केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वेकोलीची कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.आंदोनस्थळी भर उन्हात आमदार आंदोलन करत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्याप्रमाणात गोळा झाले होते.यावेळी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक इलियास हुसेन नागपूर येथील अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीतील मुद्देनिहाय सकारात्मक माहितीचा निरोप घेऊन स्वतः येऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या आ.भोंगळेसोबत झालेल्या चर्चेनुसार 2 महिन्यात पूर्ण करणार असल्याचे सांगितले.ज्या मागण्या वाचून दाखविल्या,त्यातील 99 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या मिळणार असल्याचे संगितले.यावेळी आ.देवराव भोंगळे,यांनी शेतकऱ्यांना मागण्या मान्य आहे काय? विचारताच सर्वांनी मान्य असल्याचे सांगत आंदोलन मागे घेतले.यावेळी आ.भोंगळे यांनी वेकोलि प्रशासनाला ठणकावून संगितले कि, कोणत्याही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, वेकोलिने आपल्या अखत्यारीत येत असलेले प्रदूषण, पुनर्वसन,रस्त्यावरील धुळीचे,यासह सर्व प्रश्न सोडविण्यास संगितले.समस्या न सोडविल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सदर आंदोलनात जिल्हा महामंत्री विवेक बोढे,राजुरा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे,तालुका महामंत्री वामन तुरानकर,दिलीप गिरसावळे,बाळनाथ वडस्कर,माथराचे सरपंच हरिदास झाडे,कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, कोरपना तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष सुरेश रागीट,शहर महामंत्री मिलिंद देशकर, सचिन डोहे,नितीन वासाडे,भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय राठोड,महामंत्री आकाश गंधारे,भाजयुमो राजुराचे प्रफुल घोटेकर,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,महिला शहराध्यक्षा माया धोटे,उज्वला जयपूरकर,प्रिती रेकलवार, अल्का जुलमे,लक्ष्मी बिश्वास,ममता केशेत्तीवार,दीपा बोंथला,वैभव पावळे,स्वप्नील पहानपटे,आसिफ़ सय्यद, मंगल चव्हाण,विनोद नरेन्दुलवार,सचिन भोयर,छबिलाल नाईक,सागर भटपल्लीवार,रामास्वामी रावला,प्रदीप मोरे, राजकुमार भोगा,महेश झाडे,दीपक झाडे,स्वप्नील राजूरकर, सचिन बल्की,श्रीनिवास मंथनवार,रमाकांत निमकर,प्रतिक कावळे,सीणु पंझा,ज्ञानेश्वर लांडे,पोर्णिमा उरकुडे,सुभाष बोनगिरवार,सुभाष रामगिरवार,सुचिता माऊलिकर,यांसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#MLA Devraodada Bhongale...
#WCL....
#Farmers land
#BJP...