Gadchandur : "जनसेवा हीच ईश्वर सेवा" राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या पुढाकाराने व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा क्रेंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गडचांदूर तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे)यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मार्च रोजी गडचांदूर येथे 'भव्य महाआरोग्य शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते विविध आजार असलेल्या 1590 रुग्णांची तपासणी करण्यात आली.392 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.यातील पहीली तुकडी 24 मार्चला 90 रुग्ण,दुसरी तुकडी 27 मार्चला 95 रुग्ण,तीसरी तुकडी 8 एप्रिलला 45 रुग्ण तर 15 एप्रिल रोजी 45 रुग्णांची चौथी तुकडी शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघेकडे रवाना झाली आहे. त्याठीकाणी त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. गडचांदूर भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी रुग्ण रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.यावेळी कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंच्वार,रमेश चुदरी,योगेश चुदरी,विनोद कावटकर,महेश वाघमारे,योगेश बांदूरकर इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
#Marathi News...
#MLA Deorao Bhongle...
#Maha Aarogya Camp in Gadchandur...
#MLA Deorao Bhongle...
#Health Camp...