LCB Action Against Cattle Smuggling : गोवंश जनावरे तस्करीवर LCB ची कारवाई !|Marathi News.

News@Cattle Smuggling...

Chandrapur : जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा LCB ला निर्देश दिले असता LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी वेगवेगळ्या पथके तयार करून कारवाईला सुरुवात केली.याच श्रेणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की,रात्रीच्या वेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीवरून मुल-चंद्रपूर मार्गे तेलंगाणा राज्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक होणार आहे.

    मिळालेल्या या माहितीवरून तात्काळ नाकाबंदी करून सापडा रचण्यात आला.दरम्यान चामोर्शीवरून येणाऱ्या 2 संशयीत ट्रकला थांबविले असता,मागच्या ट्रकमधील चालक व त्याच्या सोबतचा एक इसम पळून जाण्यास यशस्वी झाला.दोन्ही ट्रकची पाहणी केली असता,दोन्ही ट्रकला वरून प्लॅस्टीकच्या ताडपत्रीने झाकुन,त्यामध्ये 35-65 असे एकूण 70 गाय,बैल(गोवंश)दिसून आले.ट्रक आणि जनावरांसह एकूण 54 लाखांचा माल जप्त करून सर्व जनावरे प्यार फाऊंडेशन(गौरक्षण संस्था)पडोली,येथे जमा करण्यात आले.ट्रक चालक राजीक जब्बार खान 50 रा. गडचांदूर,शाहरुख खान रा.नागपूर,करीम खान रा.नागपूर, राजू कुरेशी रा.कामठी रोड,पिली नदीजवळ नागपूर (मालक),इरफान शेख रा.गडचांदूर,प्रशांत बाला जुमनाके रा.गडचांदूर,अशी आरोपींची नावे असून मूल पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई 16 एप्रिल रोजी करण्यात आली असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.मधुकर सामलवार,पोउनि. सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा.रजनीकांत पुठ्ठावार,पोहवा.सतिश अवधरे,पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा. सुरेंद्र महंतो,पोहवा.चेतन गज्जलवार,कार्तीक खनके (सायबर पो.स्टे.),पोशि.प्रशांत नागोसे,किशोर वकाटे,गणेश भोयर,शशांक बदामवार,चापोहवा.दिनेश आराडे,चापोअं. मिलींद टेकाम LCB चंद्रपुर, पोलीस स्टेशन तळोधी येथील सपोनि.संगिता हेलोंडे,पोहवा रत्नाकर देहारे,अक्षय हटवार,सुरेश आत्राम यांनी केली आहे.

#Cattle Smuggling...

#Local Crime Branch Chandrapur...

#LCB Action Against Cattle Smuggling...

                                      ----------//----------