Human Trafficking Crime : मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश !|Marathi News...

News@Human Trafficking...

         Rajasthan : जयपुरजवळ गरीब कुटुंबातील महिला, मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणारी एक स्वयंसेवी संस्था असून या संस्थेच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.ही स्वयंसेवी संस्था चालवणारी महिला गरीब कुटुंबातील मुलींची तस्करी करणाऱ्या एजंटकडून मुलींना विकत घ्यायची आणि त्या अडीच ते पाच लाख रुपयांना वधू शोधणाऱ्या तरुणांना विकायची.याचं संस्थेतील एका मुलीने या नराधमांच्या तावडीतून सुटून पोलिसांशी संपर्क साधला आणि तस्करीचा पर्दाफाश झाला.

                मिळालेल्या माहितीनुसार,गायत्री असे या संस्था चालवणाऱ्या महिलेचे नाव आहे.गायत्रीच्या सर्व समाज फाउंडेशनने जयपूरपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या बस्सीच्या सुजानपुरा गावात एका फार्महाऊस मध्ये आपले कार्यालय स्थापन केले होते.येथे ती मुलींचा व्यवहार करायची.मुलींना तस्करी एका टोळीचे सदस्य बिहार,पश्चिम बंगाल,ओडिशा आणि उत्तर प्रदेश,येथील गरीब कुटुंबातील मुलींना 'खरेदी' करायचे आणि त्या 'NGO'च्या संचालीका गायत्री विश्वकर्मा,यांना 'विकायचे'. गायत्री या मुलींना लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणांना अडीच ते पाच लाख रुपयांना 'विकायची.मुलींचा रंग,उंची आणि वयानुसार 'किंमत' ठरवायची.गायत्री अल्पवयीन मुलींचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दाखवण्यासाठी बनावट आधार कार्ड बनवत होती.तिने असे सुमारे दीड हजार लग्न लावले होते.

          दरम्यान,रविवारी उत्तर प्रदेशातील एका 16 वर्षीय मुलीने फार्महाऊसमधून पळून जाऊन पोलिसांशी संपर्क साधला.तेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश झाला.मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे,पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला आणि गायत्री,तिचा सहकारी हनुमान,भगवान दास आणि महेंद्र अशी ओळख पटवणाऱ्यांना अटक केली.हे किशोरवयीन मुलीला 'खरेदी' करण्यासाठी तिथे गेले होते. पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

#Crime News....

#Rajasthan...

#Jaipur...

#Human Trafficking...

                                            ----------//----------