Social MediaViral video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी कोणी त्याची कला दाखवताना दिसतो तर कधी कोणी आपले चांगले-वाईट अनुभव शेअर करताना दिसतो.यातील काही व्हिडिओ आपण थक्क होतो तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला प्रेरणा मिळते.कधी मैत्रीच्या नात्याविषयी तर कधी आई-वडिल,मुलं,बहीण-भावाच्या नात्याविषयी तर कधी पती-पत्नीच्या नात्याविषयी भावूक करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात.यात मात्र,सासू-सूनेच्या नात्यातील गोडवा खूप क्वचितच दिसून येतो.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये सासूने सुनेला खूप भावनिक पत्र लिहिले आहे आणि हे पत्र तिच्या वाढदिवशी सासरे वाचून दाखवत आहे.हा भावुक करणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातील अश्रु थांबणार नाही.सध्या हा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.हा व्हायरल व्हिडीओ वाढदिवसाचा आहे.सासू सासरे सुनेचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.तिच्या एका बाजूला सासू तर एका बाजूला सासरे बसलेले आहे.तिच्यासमोर टेबलबर केक ठेवला आहे. सासूबाईने सुनेसाठी लिहिलेले पत्र सासरे वाचून दाखवत आहे.
"नेमकं काय लिहिलंय पत्रात"
'प्रेमानं सुनेची तू कन्या कधी झालीस,हे कळलंच नाही मला. बरं झालीस तू माझी मुलगी म्हणून माझ्या वाटेला आली नाही,नाहीतर तू ही लग्नानंतर सासरी गेली असतीस.आता तू सून असल्यामुळे मी घरात जितके वर्ष असेल तोपर्यंत मी तुझ्याच -तुझ्या सोबत आणि तु माझ्यासोबत सैदव राहणार आहेस.मायेचं वर्ष घडत अनेक जन्मांतरी पुण्य शिल्लक असल्यामुळं तू मला सून म्हणून मला ते मिळाले,मी देवाचे आभार मानतो.तुमचा स्वभाव शांत आणि समंजस आहे. तणावपूर्वक वातावरणात सुद्धा समंजसपणा आणि प्रेमाने राहते.योगेश बाहेर असतानाही मला मायेने,काळजीने सांभाळते आणि काय हवं मला.तुझ्या हाताच्या चवदार रंगामुळे तू नातेवाईकांमध्ये आपलंस करून घेतलं.खरंच अन्नापूर्णा राहणे,जीवनामध्ये किती गरजेचं आहे.त्यामुळे सर्व तुझे कौतुक करतात.खरं सांगू का तेव्हा मला माझा अभिमान वाटतो.किती लिहू आणि काय काय लिहू मी धन्य झाले.' "अंजू"
हे पत्र वाचत असताना सून आणि सासू दोन्ही भावुक होताना दिसतात.सुनेला अश्रु आवरत नाही.व्हिडीओच्या शेवटी त्या एकमेकींना मिठी मारताना दिसतात.
#Emotional Letter...
#Social MediaViral video...
#Emotional letter from Mother-in-law to Daughter-in-law...