#Eid Milan Celebration : ईद मिलन समारोह उत्साहात!|Marathi News...

News@Eid Milan...

Gadchandur : मी कधी मुस्लिम समाजाला वेगळा मानत नाही.तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला आलात,मी कोणत्या धर्मात जन्माला आलो, हे काही आमच्या तुमच्या हातात नाही,बंधूभावा(भाईचारा)चा नवीन पुल बांधण्याची आवश्यकता आहे,मी याठिकाणी राजकारण करायला नाही आलो,माणसं जोडण्यासाठी आलो आहे.मी मतांचा राजकारण कधीच करत नाही,मी तुमचा सेवक आहो,या मतदारसंघात जातीपाती,धर्माच्यावर जावून माणूस म्हणून माणसांची सेवा करण्याचा काम मला करायचे आहे.मी असा कार्यकर्ता आहो,बोलण्यामध्ये माझा विश्वास नाही, कृती करण्यामध्ये माझा विश्वास आहे.येणाऱ्या कालखंडामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रश्नांसाठी मला काम करायचा आहे.निश्चितच आजपर्यंत आमच्या मुस्लिम बांधवांना नेहमी असुरक्षततेची भावना राहते,या मतदारसंघात आमचा मुस्लिम बांधव सुरक्षितच राहीला पाहिजे,याची जबाबदारी आमची राहणार आहे.सुरक्षतेची भावना मला तुमच्या मनात निर्माण करायची आहे.हे निर्माण करताना हा देवराव भोंगळे आमदार,मुस्लिम बांधवांचा आमदार आहे,हा भाव तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे,असे काम मला करायचे आहे.असे मौलिक मत राजुरा विधासभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी व्यक्त केले.ते गडचांदूर येथे ईद मिलन समारोह कार्यक्रमात बोलत होते.रमजा़न ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार देवरावदादा भोंगळे यांनी 11 एप्रिल शुक्रवार रोजी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयातील पटांगणावर 'ईद मिलन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते.      या भव्यदिव्य अशा कार्यक्रमात गडचांदूर रजा़ मशिदीचे इमाम हसनैन रज़ा आणि सदर शेख खाजा,गौसीया मशिदीचे इमाम सय्यद रियाज़ आणि सदर अज़िज़ कुरेशी, मोहम्मदीया मशिदीचे इमाम हाफीज़ इम्तियाज़ आणि सदर सय्यद नज़र अली,मस्जिद ए कुरैशचे इमाम सज्जाद अली, मदीना मशिदीचे इमाम मोहम्मद तस्लिम आणि सदर सिराज जिलानी,एल&टी मशिदीचे इमाम अनिस साहेब, गडचांदूर ग्र.पं.चे माजी सरपंच शेख रऊफ़,सय्यद आबीद अली,भाजपचे विवेक बोढे,कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,रफीक निजा़मी,हबीब शेख,सय्यद जा़कीर अली,नासीर खान इतरांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.आमदार भोंगळे यांनी सर्वांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.    आमदार देवराव दादा भोंगळे पुढे म्हणाले की, योजनांचा लाभ देताना आमच्या सरकारने धर्म बघीतला नाही,जे जे गरजू व्यक्ती आहेत,त्यांना लाभ देण्याचा काम केला.या देशावर जेवढा अधिकार हिंदूंचा आहे,तेवढाच अधिकार मुस्लिमानचा आहेत.आणि म्हणून कोणताही भेद-भाव न करता सरकारच्या माध्यमातून यांना विविध योजनांचा लाभ देणे सुरू आहे.महाराष्ट्रामध्ये,या राजुरा विधानसभेचा उदाहरण तयार झाला पाहिजे की,या मतदारसंघात हिंदू, मुस्लिम,सिख,इसाई,हे बोलण्यापुरतेच नाही,तर प्रत्येक्षात भाईचारा राखण्याचा काम,या राजुरा मतदारसंघात होवू शकते.हे समाजाला दाखवण्याचा काम आम्हाला करायचा आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासोबत जवळीक साधता आली पाहिजे,तुमच्या मनात काही प्रश्न असतील!तुमच्या मनात काही अविश्वास असेल!तर,अविश्वास दूर करून एक विश्वासाचा नवा नाता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आलो.जेव्हा-जेव्हा मुस्लिम समाजात अडचणी येतील तेव्हा-तेव्हा देवरावभाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. निश्चितच हा विश्वास घेऊन पुढे जायचा आहेत.भविष्यात मुस्लिम समाज जी-जी विकासाची मागणी करेल,ती-ती विकासाची मागणी पूर्ण करण्यासाठीचा अभिवचन मी यानिमित्ताने तुम्हाला देतो.सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो. आणि जाताना एक विश्वास घेऊन जा,"देवराव भोंगळे हा सुद्धा मुस्लिम बांधवांचाच बांधव आहेत.असे आपुलकीचे मत आमदार देवराव दादा भोंगळे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहेत.सदर कार्यक्रमाचे संचालन इम्रान पाशा शेख, प्रास्ताविक रफीक निजा़मी तर आभार मेहताब शेख सर यांनी व्यक्त केले.मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती.

                             ----------//----------

''आजपर्यंत असा कार्यक्रम एकाही आमदाराने घेतला नाही!''

              राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे  यांच्या पुढाकाराने,यांच्या नेतृत्वात येथील कार्यकर्त्यांनी 'ईद मिलन'चा कार्यक्रम ठेवला.गडचांदूरातील मुस्लिम बांधवांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. कारण,आजपर्यंत 'गडचांदूर शहरामध्ये असा ईद मिलनचा कार्यक्रम एकाही आमदाराने घेतला नाही'. पहिल्यांदाच असा कार्यक्रम गडचांदूर नगरीत झालेला आहे.एक चांगला कार्यक्रम झाला असून त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की,हा आमदार आपल्या साठी काही तरी करणार आणि आनंदाचा उत्साह पसरला आहे की,आमच्या जवळ येऊन,आमच्या समस्या ऐकत आहे आणि समस्याचा निराकरण करण्यासाठी आश्वासन देत आहेत.असा आमदार आपल्याला मिळाला आहे. भविष्यात या आमदारांकडून आपल्याला विकास कामाबद्दल चांगल्या अपेक्षा आहे.शिक्षण,आरोग्य,सुरक्षा, इतर मुद्दे आम्ही आमदारापुढे मांडलेला आहे.साऱ्या मुद्यांना हात लावत आमदार दादांनी ग्वाही दिली की,मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि तुम्ही कधीही माझ्याकडे या,अर्ध्या रात्री फोन करा, मी तुमच्या संकटकाळी तुमच्या सोबत राहील!याचे मी खूप खूप आभार मानतो.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस(SP)चे जिल्हा महासचिव 'रफी़क निजा़मी' यांनी 'कोरपना Live' ला दिली आहे.

#Eid Milan Celebration...

#Marathi News...

                                      -----------//----------