Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration 2025 : भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांची 134 वी जयंती 14 एप्रील रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याच श्रेणीत गडचांदूरातही संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीने 14 एप्रील रोजी सकाळी धम्म ध्वजारोहण व अभिवादन,भव्य बाईक रॅली आणि सायंकाळी स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून विशाल धम्म रॅली काढण्यात आली.आकर्षक रोषणाई व डिजेच्या नादात वाजतगाजत शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत सदर रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला.'तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं' डिजेवर वाजत असलेल्या अशाप्रकारच्या विविध गीतांवर तरूणाईचे नृत्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते.'जय भीम'च्या गगनभेदी जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमला होता. दरम्यान राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सदर रॅलीला भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तरूणाई सोबत डिजेवर ठेकाही धरला.महामानवाला वंदन करण्यासाठी गडचांदूरात जनसागर उसळला होता.आमदार भोंगळे यांच्या हस्ते संयुक्त जयंती समारोह समिती अध्यक्ष डॉ. हेमचंद दुधगवळी,सचिव सचिन कांबळे,कोषाध्यक्ष प्रशांत खैरे,कार्याध्यक्ष कवडू सोनडवले,संयोजक देवीदास मून, संघटक रवी पथाडे,उपाध्यक्ष प्रेम वानखेडे,यांच्यासह सहसचिव,सहसंघटक व सभासदांचा सत्कार करण्यात आला.
रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.एकुणच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्षोल्लास व थाटामाटात,शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
#Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration 2025...