News@Crime...
Gadchandur : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर, येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे आज 10 एप्रिल गुरुवार रोजी दोन युवकांपैकी एकाचा मृतदेह तर एक बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.दोघेही मित्र असल्याचे कळते.प्रज्वल नवले वयवर्ष 21,वार्ड नंबर 3,याचा मृत्यू झाला तर नागेश लांडगे वयवर्ष 20 वार्ड नंबर 6,हा बेशुद्ध आहे.दोघेही रा.गडचांदूर यांनी विषप्राशन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यामागचे कारण काय? चित्र अस्पष्ट असले तरी प्रेम प्रकरणातून सदर घटना घडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.बेशुद्ध असलेल्या मित्राला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून तो शुद्धीवर आल्यानंतर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे ते काय समोर येणार आहे.मात्र,ही हत्या की आत्महत्या? शंकाकुशंकांना पेव फुटले असून सदर प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
#Crime News...
#Gadchandur Breking News...