Chandrapur : दारुच्या नशेत आईसोबत वाद घालत मारहाण करणाऱ्या मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलालाही मारहाण केल्याने स्वसंरक्षणासाठी वडिलांनी बैलबंडीच्या उभारीने मुलाच्या डोक्यावर वार केला.यामध्ये मुलाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मूल तालुक्यातील येसगाव,येथे 21 एप्रिल सोमवार रोजी रात्री अंदाजे 8 च्या सुमारास घडली.चंद्रशेखर नागेंद्र वाढई वयवर्ष 35,असे मृतक मुलाचे नाव तर नागेंद्र पांडुरंग वाढई वयवर्ष 65,असे आरोपी वडीलाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मूल तालुक्यातील येसगांव येथील नागेंद्र वाढईला 3 मुले आहेत.काही वर्षापूर्वी एकाचा मृत्यू झाला,एक मुलगा कामानिमित्य बाहेरगावी राहात आहे.तर चंद्रशेखर हा अविवाहीत होता,तो आपल्या आई-वडीलासोबत राहात होता,व्यसनाधीन होता,दररोज भांडण करीत आई-वडीलांना मारझोड करायचा.सोमवारी आई भेजगांव येथे आठवडी बाजार करून घरी परतल्यानंतर दारुच्या नशेत अंगणात झोपलेल्या चंद्रशेखरने आईसोबत भांडण करून मारझोडही केली,घर पेटवून देण्याची धमकी देत होता.दरम्यान वडील आले.चंद्रशेखरला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतू,त्याने वडीलांनाही मारहाण सुरु केली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांनी बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर वार केला.त्यात तो जागीच ठार झाला.घटनेनंतर आरोपी वडिलांनी स्वतः पोलीस पाटील राजू कोसरे,यांना घटनेची माहिती दिली. परि.पो.उपअधिक्षक तथा मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौघुले,यांच्या मार्गदर्शनखाली नागेंद्र वाढई यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#Crime...
#Father kills drunk son...