Confusion,Gadchandur News : 'त्या' प्रकरणातील दूसऱ्या तरुणाचाही मृत्यू!|Marathi News.

News@Death Case... 

      Gadcandur : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात 10 एप्रिल गुरुवार रोजी एक खळबळजनक घटना घडली. शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे 2 मित्रांपैकी एक तरूण मृत तर दुसरा बेशुद्ध अवस्थेत सापडला होता.प्रज्वल नवले वयवर्ष 21,रा.गडचा़दूर वार्ड क्रं.3,याचा मृत्यू झाला होता.तर,नागेश लांडगे वयवर्ष 20  रा.गडचांदूर वार्ड क्रं.6,हा बेशुद्ध अवस्थेत होता.नागेशवर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याठिकणी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डाॅक्टरांकडून सुरू असतानाच,अखेर 12 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 9/30 वाजताच्या सुमारास नागेश आयुष्याच्या झुंजीत मृत्यूपुढे हरला.

    आता दोघेही मरण पावल्याने सदर प्रकरणाचे गूढ कायम असून अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत? त्यांच्या मृत्यूचा खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होणार आहे? असे असताना मृतक नागेश लांडगे व प्रज्वल नवले,यांचे कुटुंबीय व गडचांदूर शहरातील नागरिकांमध्ये यांच्या मृत्यूबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.प्रज्वलच्या मृत्यूने वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले असताना,त्यातच आता त्याचा मित्र नागेशच्या मृत्यूने हे प्रकरण अजूनही गुणतागुणतीचे झाले आहेत.ते दोघे कसे काय विष किंवा विषयुक्त पेय घेऊ शकतात? यावर कुटुंबीयांच्या मनात शंका आहे.मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी,हे प्रकरण प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याचीच चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.

#Death Case... 

#Confusion Gadchandur News...

                                       ----------//----------