Chandrapur Crime News : हातात तलवार घेऊन वार्डात दहशत पसरविणाऱ्याला अटक!|Marathi News...

News@Crime...

           Chandrapur : हातात तलवार घेवून वार्डात दहशत पसरविणाऱ्या एका आरोपीच्या रामनगर गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहे.प्रेम अमर बोपारे वयवर्ष 25 रा.दत्तनगर वार्ड चंद्रपूर,याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.12 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन रामनगर,येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींगवर असतांना रात्री अंदाजे 8 च्या सुमारास त्यांना गुप्त माहिती मिळाली की,नागपूर रोड दत्त नगर वार्ड,भारत फोम दुकानाच्या  मागे एक इसम हातात लोखंडी तलवार घेवून वार्डात दहशत पसरवीत सार्वजनिक रस्त्यावर फिरत आहे.त्याच्या या कृत्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही?

    अशा माहितीवरून घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेत रामनगर गुन्हे शोध पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन आरोपी प्रेम बोपारेला ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील एक धारदार स्टिलची मुठ असलेली लोखंडी तलवार जप्त करून त्याच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख,तसेच रामनगर गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि.देवाजी नरोटे,सपोनि.उगले, पोहवा.पेत्रस सिडाम,पोहवा.शरद कुडे,पोहवा.सचिन गुरनुले,पोहचवा.आनंद खरात,पोहवा.प्रशांत शेंद्रे,पोहवा. लालु यादव,मपोहवा मनिषा मोरे,पोशि.हिरालाल गुप्ता, पोशि.रविकुमार डेंगळे,पोशि.प्रफुल पुप्पलवार,पोशि.संदीप कामडी,पोशि.पंकज ठोंबरे,मपोशि.ब्युल्टी माखरे यांनी केली आहे.

#Crime News...

#Chandrapur District Crime...

                                       ----------//---------