Chandrapur : जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,यांनी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी वेगवेगळ्या पथके तयार करून कारवाईला सुरुवात केली आहे.याच श्रेणीत 11 एप्रिल रोजी LCB चे पथक बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असतांना गुप्त माहिती मिळाली की,स्थानिक पेपरमीलच्या मागे,वर्धा नदीच्या काठी निखील रणदिवे रा. बल्लारशाह,हा काही इसमांच्या सोबत(ताश)52 पत्यांचा कट पत्ता जुगार खेळत आहे.
मिळालेल्या या माहीतीवरून,सदर ठिकाणी सापळा रचुन धाड टाकली असता,घटनास्थळावर चंद्रपूर,राजुरा, बल्लारपूर,येथील एकुण 11 जुगारी,जुगार खेळताना मिळून आले.जुगारच्या डावासह त्यांची अंगझडतीत एकुण 1 लाख,78 हजार,300 रूपयांचा मुद्देमाल LCB पथकाला मिळून आला.11 आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्यावर बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुर्दशन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात LCB चे पोलीस उपनिरीक्षक, विनोद भुरले,पोउपनि.मधुकर सामलवार,पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.गौरकार, सफौ.करकाडे,पोहवा.सतिश अवथरे,रजनिकांत पुठ्ठावार, नितीन कुरेकार,पोकॉ.प्रशांत नागोसे,शशांक बादमवार, प्रफुल गारघाटे,यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News...
#Local Crime Branch takes strong action...