Gadchandur : गडचांदूरवरून राजुराकडे जात असताना एक दुचाकी डिव्हायडरला धडकून एक तरूण आणि एका तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 15 एप्रिल रोजी गडचांदूर राजुरा मार्गावरील होली फॅमिली कॉन्व्हेन्ट ट्रनिंगवर सकाळी अंदाजे 11 च्या सुमारास घडली आहे. अनूज भोयर वयवर्ष अंदाजे 26,आणि कु.प्रणाली पुसाम वयवर्ष अंदाजे 22,दोघेही राहणार बेला पाटण,अशी मृतकांची नावे असून हे काही कामानिमित्त दुचाकीने राजुराकडे जात होते.दरम्यान दुचाकी डिव्हायडरला धडकली आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. दोघेही घराशेजारी असल्याचे कळते.घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.दोघांचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.सदर घटनेची वार्ता पोहोचताच कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला,गावात शोककळा पसरली आहे.हे दोघेही भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या गावाचे रहिवासी असून हिवरकर यांनी सदर घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीकची तपास करत आहेत.
#Accidental death...
#Accident in Gadchandur...