ACB Trap in Chandrapur District : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!|Marathi News.

Newe@ACB Trap...

         Chandrapur : बल्लारपूर येथील तहसीलदार आणि तलाठ्याला लाच मागणे चांगलेच महागात पडले आहे.2 लाख 20 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभाग ACB ने पडताळणी करून तहसीलदार अभय अर्जुन गायकवाडला ताब्यात घेतले आहे.तर,कवडजई साजा येथील तलाठी सचिन पुकळे याचा शोध ACB घेत आहे.तक्रारदाराला मुरूम प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 2 लाख 20 हजार रुपयाची या लोकसेवकांनी मागणी केली होती.या आधी 1 लाख 19 हजार स्वीकारले असताना 1 लाखासाठी आणखी या लोकसेवकांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता.

   ACB ने पडताळणी करून या तहसीलदार आणि तलाठी च्या मुसक्या आवळत बल्लारपूर येथे गुन्हा नोंदवत आज बल्लारपूर तहसीलदार ला ताब्यात घेतले आहे.चंद्रपूर ACB ने केलेल्या कारवाई ने महसूल प्रशासनातला भ्रष्टाचार समोर आला आहे.सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक LCB नागपुर,संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक LCB नागपूर,सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक LCB नागपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले LCB चंद्रपूर तसेच कार्यालयीन स्टाफ पोहवा.रोशन चांदेकर,हिवराज नेवारे, पोअं.अमोल सिडाम,प्रदिप ताडाम व चापोशि.सतीश सिडाम यांनी केली आहे.

#ACB Trap ...

#ACB Trap in Chandrapur District...

                                     -----------//-----------