News@Shocking...
Gadchandur : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका तरूण शेतकऱ्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना 20 मार्च गुरुवार रोजी समोर आली आहे.गजानन रामदास वाटेकर वयवर्ष अंदाजे 32,रा.भोयगाव ता.कोरपना,असे मृतकाचे नाव असून गजानन 19 मार्च बुधवार रोजी सकाळी वर्धा नदीला लागून असलेल्या आपल्या शेतात गेला.परंतु,सायंकाळ झाली तरी तो घरी आला नाही.घरच्या लोकांनी गावकऱ्यासोबत शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शेतात जाताना एका शेतकऱ्याला नदीपात्रात काही तरंगताना दिसून आला.याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी होडीच्या साहाय्याने पाहणी केली असता गजाननचा मृतदेह पाण्यात तरंगत होता.गजाननचा शोध लागल्याची माहिती पोलीस पाटील भोयगाव,आणि गडचांदूर पोलीस स्टेशनला देण्यात आली.दरम्यान माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.गडचांदूर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. गजाननच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले,असा आप्तपरिवार असून सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
#Shocking News...
#Youth drowned in water...
#Young farmer dies after drowning in water...