Chandrapur,Nagabhid : नागभीड तालुक्यातील घोडाझरी प्रकल्पावर पिकनिकसाठी गेलेले 5 तरूण मुले तलावात बुडाल्याची घटना 15 मार्च शनिवार रोजी सायंकाळी अंदाजे 4 च्या सुमारास समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम राबवून पाचही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.हे पाचही तरूण चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील होते.जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,अनिकेत यशवंत गावंडे,तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे,अशी तरुणांची नावे आहेत.यापैकी 2 सख्खे तर 2 चुलत भाऊ असून हे 4 जण गावंडे कुटुंबातील आणि एक मित्र असल्याचे कळते.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी पर्यटनस्थळ असून याठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे.तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते.शनिवार आणि रविवार रोजी येथील तलावावर बाहेरूनही पर्यटक येतात.घटनेच्या दिवशी चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,अनिकेत यशवंत गावंडे,तेजस बालाजी गावंडे,तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली,हे 6 तरुण मुले पर्यटनासाठी आली होती.दुपार पासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.त्यानंतर त्यांना पोहायाचा मोह आवरला नाही. त्यामुळे सायंकाळी अंदाजे 4 च्या सुमारास नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात 6 तरुण मुले पोहण्यासाठी तलावात उतरली.
पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्याने सहाही जण डोहमध्ये बुडाले.त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा 16 वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,अनिकेत यशवंत गावंडे,तेजस बालाजी गावंडे,तेजस संजय ठाकरे,हे पाचही तरूण तलावात बुडाली.सर्व मुले 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत.तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली.त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली.घटनेची माहिती तरुणांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आली.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी करून तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.
#Shocking News...
#Ghoda Jhari Lake drowning...
#rescue operation in Chandrapur...