Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती!| Marathi News.

News@Ration Card...

  Korpana : शासनाने शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले.ई-केवायसी(E-KYC)न केल्यास शासनाकडून मिळणारे धान्य मिळणार नाही.स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदाराकडे ई-पास मशीन(E-Pass Machine)द्वारे मोफत केवायसी करण्यात येत आहे.तर काही तांत्रिक बाबी निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटात आपल्या मोबाईलवरून कुटुंबाची ई-केवायसी पूर्ण करण्यात येणार आहे.त्यासाठी शासनाने 'मेरा ई-केवायसी' हे ॲप(E-KYC App) उपलब्ध करून दिले.केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च अखेरची मुद्दत देण्यात आली आहे.असे आव्हान तालुका पुरवठा अधिकारी विक्की देवघरे यांनी केले आहे. 

    सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्याचे वितरण करण्यात येते.पास मशीनद्वारे धान्याचे वितरण केल्या जात असेल तरी तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपी चा वापर करून लाभार्नथ्यांना धान्याची उचल करता येते. परंतू संबंधित लाभार्थ्याचा मोबाईल नंबर शिधा पत्रिकेशी संलग्न असणे आवश्यक आहे.स्वस्त धान्याचे वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे धान्य दुकानदाराच्या अनेक तक्रारी येत आहे.अशाप्रकारे आळा बसणे आवश्यक आहे.स्वस्त धान्याचे वितरण निकोस पद्धतीने व्हावे यासाठी ई-पास मशीनवर धान्याचे वितरण केल्या जात आहे.तालुक्यातील अनेक कार्डधारकांनी मोबाईल नंबर लिंक केला नाही.त्यामुळे शिधापत्रिका धारकांनी आपला मोबाईल नंबर शिधापत्रिकाशी लिंक करावा असे पुरवठा विभागाकडून सुचित करण्यात आले आहे.

                               --------//--------

अद्याप अनेक शिधापत्रिकाधारकांनि वेगवेगळे कारणे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा ई- केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढ दिली आहे. कोरपणा तालुक्यातील 19243 लाभार्थ्यांची ई-केवायसी होणे बाकी आहे.तरीही ज्यांची ई-केवायसी अद्याप करून घेतलेली नाही त्यांनी तात्काळ 31 मार्चपर्यंत इ-केवायसी करून घेणे गरजेचे आहे,यासाठी सर्व स्वस्त धान्य लाभार्थ्यांना आव्हान करण्यात येत आहे.

        'विक्की देवघरे' पुरवठा निरीक्षण अधिकारी

                      (तहसील कार्यालय कोरपना.)

                             -----------//------------

#Ration Card...

#E Pass Machine...

#Important Information for Ration Card Holders...

                                 ----------//----------