News@Korpanalive...
Chandrapur : पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीतील पिंक पैराडाईज बार अँण्ड रेस्टॉरेंट एफ.एल.3 ही अनुज्ञप्ती (परवाना कक्ष)धारक,यांनी आपले बारसमोर बांधकाम साहित्य,रेती,गिट्टी बल्ली,फाटे ठेवल्यामुळे बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाहने ठेवण्यास पार्कंग व्यवस्था नसल्याने व वाहने रोडवर उभ्या असल्याने सार्वजनीक वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन सर्वसाधारण नागरीकांना अडथळा व गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच सदर बार येथे तंटे,भांडण होऊन त्याचे रूपांतर खुना सारख्या गंभीर गुन्ह्यात घडल्याने कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने परिसरातील नागरीकांच्या मागणीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 142(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार लोकहिताच्या दृष्टीने आज 11 मार्च रोजी पिंक पैराडाइज बार अँण्ड रेस्टॉरेंट,हे अनुज्ञप्ती धारक वैभव बनकर व पोलीस स्टॉफच्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर पुलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व पोलीस स्टॉफ यांनी केली आहे.
'सर्व अनुज्ञप्ती धारकांना आवाहन.'
अनुज्ञप्ती परवाना मधील सर्व अटी व शर्तीचे पालन करावे, वेळेचे बंधन पाळावे,आतील व बाहेरील भागात पर्याप्त प्रकाश व्यवस्था आणि CCTV कॅमेरा बसवावे,पार्कंगची योग्य व्यवस्था ठेवावी.कुठलाही गंभीर घटना घडत असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा आपातकालीन क्रमांक 112 वर कॉल करून माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
#Pink Paradise Bar & Restaurant Seal...