News@Crime...
Korpana : स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार आज कोरपना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असता गुप्त माहिती मिळाली की,लोणी गावालगत एका ठिकाणी काही जण कोंबडे लढतीवर हार-जीतचा जुगार खेळत आहे.या माहितीनुसार LCB ने सदर ठिकाणी धाड टाकली असता 4 आरोपींना ताब्यात घेतले इतर आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले.अमोल साधूजी खरवडे वयवर्ष 40 रा.लोणी,संजय शालीक क्षिरसागर वयवर्ष 29 रा.वनसडी, अनिल किसन बेलेकर वयवर्ष 54 रा.कोलगाव ता.मारेगांव जि.यवतमाळ तसेच राजेन्द्र नानाजी खिरटकर वयवर्ष 46 रा.गोधनी ता.मारेगाव जि.यवतमाळ असे मिळून आलेले आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून 3 हजार 600 रोख,4 जिवंत कोंबडे व झुंजीसाठी लागणारे साहित्य आणि 4 बाईक,असा एकुण 2 लाख,45 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध संबंधीत कलमान्वये कोरपना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कांकेडवार,सपोनि.बलराम झाडोकार, पोउपनि.संतोष निंभोरकर,पोहवा.किशोर वैरागडे,पोहवा. अजय बागेसर,पोहवा.जय सिंग,पोना.संतोष येलपुलवार, पोशि.प्रमोद कोटनाके,पोशि.मिलिंद जांभुळे, वाहन चालक पोहवा.दिनेश अराडे,यांनी केली आहे.
#Crime News..
#Action by Local Crime Branch Chandrapur...