Action by Gadchandur Police : बेवड्या वाहनचालकांवर गडचांदूर पोलिसांची कारवाई|Marathi News...

News@Gadchandur 🚨...

Gadchandur : होळी,धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन दिवस विशेष मोहीम राबवून,पहिल्या दिवशी 4 ड्रंक & ड्राईव्ह,37 इतर मोटर वाहन,असे एकूण 41 केसेस तर दुसऱ्या दिवशी अवैध दारू 2,जुगार 2,ड्रिंक & ड्राईव्ह 8,आणि 24 मोटार व्हिकल ॲक्टप्रमाणे असे एकूण 36 कारवाया केल्या आहेत.पुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

             होळी आणि रमजान सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांततापूर्ण वातावरणात सण साजरे व्हावे यासाठी ठाणेदार शिवाजी कदम यांनी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता.कोणत्याही अप्रिय घटना घडल्याचे समोर आले नाही.वास्तविक पाहता कोरपना तालुका सर्वधर्मसमभाव जपणारा तालुका म्हणून ओळखला जातो.येथील विविध समाज बांधव एकमेकांच्या सण-उत्सवाचा आदर सन्मान करतात.यामुळे येथे मोठ्या उत्साहात शांततापूर्ण वातावरणात विविध सण-उत्सव साजरे होतात,हे मात्र विशेष.यापुढे सुद्धा हिच परंपरा कायम राखली जाणार असल्याचे मत विविध समाजातील काही बांधवांनी व्यक्त केले आहे.

#Action by Gadchandur Police... 

#2 daru,2 jugar 8,drink & drive,24 mv act cases...

                                     -----------//------------