News@सुशिक्षित बेरोजगार...
Gadchandur:व्यवसायाभिमुख शिक्षण,पदवी घेऊन तसेच अन्य प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या सुशिक्षितांची कोरपना तालुक्यात काही कमी नाही.येथे नामांकित चार मोठे सिमेंट कारखाने अस्तित्वात असून काम करण्यासाठी हवे तेवढे शिक्षण व पात्रता आज बहुसंख्य तरूणांकडे आहे.परंतू स्थानिकांना कंपनी कामावर घेण्या ऐवजी स्थानिकांना डावलत परप्रांतीयांचा भरणा करीत असल्याचे आरोप होत आहे.याच तालुक्यात औद्योगिक नगरी,अशी ओळख असलेल्या गडचांदूर शहरात विराजमान सिमेंट कंपनीकडून सुशिक्षित बेरोजगारांची उपेक्षा होत असल्याचे आरोप होत आहे.स्थानिक पात्र तरूणांना डावलण्यात येत असल्याने नाईलाजास्तव यांना रोजगारासाठी अन्यत्र भटकंती करावी लागत आहे.या कंपनीत काम मिळेल अशी आशा स्थानिकांना होती.परंतू काही मुठभर चापलूसांच्या मुलांना व नातेवाईकांना नोकरीत प्रथम प्राधान्य देऊन गरजवंत तरूणांच्या हातात लॉलिपॉप देण्याचे काम झाले व होत असल्याची संतापजनक चर्चा ऐकायला मिळत आहे. आजपर्यंत सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.निवडणुक आली की, बेरोजगारांच्या भावनांशी खेळत मते मिळवायची आणि नंतर 'नोकरी सोडून बोला ?' असे सांगायचं,यामुळे 'सगळे एकाच माळेचे मणी' असल्याची संतप्त भावना शिक्षित बेरोजगार तरूण व्यक्त करताना आढळतात. आदिवासी,अतिदुर्गम क्षेत्रातील कोरपना तालुक्यात चार सिमेंट कारखाने अस्तित्वात आहेत.या दृष्टिकोनातून बघितले तर येथील प्रत्येक तरूणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार उपलब्ध व्हायला हवा होता.मात्र, याठिकाणी याच्या विपरीत स्थिती आहे.गडचांदूर शहरात अगदी लोकवस्तीत दुसरे प्लँट सुरू झाले.येथे तरी रोजगार मिळेल अशी आशा होती.मात्र,येथे वशिलेबाजीने काही मोजक्या आणि मनमर्जीतील लोकांना घेण्यात आल्याची चर्चा आहे.एक,दोन अपवाद वगळता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार रोजगार संदर्भात चकार शब्दही काढायला तयार नाही.त्यामुळे तरूणांनी कामासाठी जायचे तरी कुठे ? असा प्रश्न अद्यापही कायम असून निवडणुकीपुर्ता वापर करून घेत असल्याची भावना व्यक्त होत आहेत.
"स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा भरणा."
सध्या येथील अनेक कंपन्यांमध्ये परप्रांतीयांचा भरणा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.याचा भार संपूर्ण शहरावर पडत आहे.एकीकडे स्थानिक बेरोजगारीचा पारा उच्चांक गाठत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून सुद्धा या तरुणांच्या पदरी निराशाच पडत आहे. निवडणूक आली की,रोजगार निर्मितीची मोठमोठी आश्वासने दिली जातात.मात्र, प्रत्यक्षात आपले काम पूर्ण झाले की,दिलेले आश्वासन विसरतात.गेल्या अनेक दशकांपासून तरुणांची अशाच प्रकारे थट्टा,उपेक्षा सुरू आहे. यामुळे स्थानिक तरूणांना रोजगारासाठी अन्यत्र भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहेत. 'स्थानिक उपाशी, परप्रांतीय तुपाशी' असे याप्रसंगी म्हटले तर वावगे ठरणार नाही.?(एका शिक्षित तरूणाची संतप्त प्रतिक्रिया.)
#Migration of Youth to other Places in Search of Employment...
#Increase in the Number of Unemployed in Industrial City...
#Unemployment is a Big Problem for the Youth...
🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹