Sudhir Mungantiwar News : ना.सुधीर मुनगंटीवार एका बहिणीच्या प्रेमाने भारावले...

News@Sudhir Mungantiwar...

  Chandrapur : निवडणुकीची प्रचंड धावपळ, प्रचाराचा धुरळा,चाहत्यांचा गराडा,असं  सगळं वातावरण असताना ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना गहिवरून आलं.सण,उत्सव काही असो, मुनगंटीवार सातत्याने आपल्या कामात व्यस्त असतात.त्यांचा जनसंपर्क कायमचाच असतो. आलेल्या प्रत्येकाची त्यांच्याकडून आत्मियतेने विचारपूस केली जाते.प्रत्येकांबद्दल असलेल्या तळमळीच्या त्यांच्या याच स्वभावाची परतफेड आता लोक त्यांना प्रचारा दरम्यान देत आहेत. असाच एक अविस्मरणीय भावनिक प्रसंग नुकताच घडला.

दिवाळीच्या उत्सवात येणारा भाऊबीजेचा क्षण हा,भाऊ बहिणींमधील नात्याच्या दृष्टीने फारच भावनिक असतो.यंदा दिवाळी आणि विधानसभा निवडणूक एकत्र आल्याने सध्या सर्वत्र प्रचार सुरू आहेत.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मात्र प्रचार नसून जनसंपर्क सुरू आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या सुधीर भाऊंच्या प्रति लोक आता आपापल्या पद्धतीने भावना आणि आदरयूक्त प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.एक महिला गर्दीतून वाट काढत आली आणि मोठ्या प्रेमाने भाऊंचे औक्षण केले.एका बहिणीचे प्रेम पाहून भाऊ अक्षरशः भारावले होते. 

                   'ताई मी आता काय बोलू ?'

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा होता.या गरड्यातून वाट काढत एक महिला पुढे सरसावली.या महिलेच्या हातात एक थाळी होती.थाळीत असलेल्या दिव्यातील ज्योती भाऊंची प्रतीक्षा करीत होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून भाऊंचे लक्ष त्या महिलेकडे गेले.क्षणाचाही विलंब न लावता ते देखील पुढे सरसावले आणि तो भावनिक क्षण जुळून आला.इटोली गावातील मायाबाई चरणदास पिपरे,यांनी सुधीर मुनगंटीवार यांना औक्षण केले.'भाऊबीजेच्या शुभ पर्वावर एका गरीब बहिणीकडून तुम्हाला शुभेच्छा,' असे शब्द मायाताईंच्या तोंडून बाहेर पडले.हे बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता.त्यांच्या भावना आणि बहिणीचे प्रेम,त्यांच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा स्पष्टपणे सांगत होत्या. गावातील बहिणीचा हे प्रेम पाहून मुनगंटीवार देखील गहिवरले.अत्यंत नम्रतेने दोन्ही हात जोडत त्यांनी आपल्या या बहिणीचे औक्षण स्वीकारले. 'ताई मी आता काय बोलू ?' अशा भावना भाऊंच्या मनात दाटून आल्या.

असेच अनेक भावनिक प्रसंग सुधीरभाऊंच्या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान दिसून येत आहे. आपली राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून सुधीरभाऊ,हे जनतेची सेवा,ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य मानतात.आपल्यावर जनसेवेची मोठी जबाबदारी आहेत.त्यामुळे जातपात,धर्म,पंथ,याच्या पलीकडे जात आपल्याला काम करायचं आहे,असच ते नेहमी सांगत असतात.सुधीरभाऊंच्या बाबतीत ‘दिला शब्द केला पूर्ण' असं ठामपणे सांगण्यात येतं. त्यामुळे लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे भाऊंना अशा अनेक बहिणी औक्षण करीत आहेत.ज्येष्ठ नागरिकांचे थरथरणारे अनेक हात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सरसावत आहेत. आजपर्यंत अनेकांच्या मदतीसाठी भाऊ धावून गेले.आपण किती लोकांना मदत केली,याचा हिशोब त्यांनी कधीच ठेवला नाही.सत्कर्म करत रहा,या श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.अशातच अनेक गावात गर्दीतून अचानकपणे कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो 'भाऊ आज जे आमचं चांगलं होत आहे,ते तुमच्यामुळेच,तुम्ही त्यावेळेला मदत केली नसती तर...' असे अनेक प्रसंग सध्या सुधीरभाऊंच्या सोबत असलेल्या सर्वांनाच अनुभवायला येत आहे.यावर भाऊ अत्यंत नम्रपणे एकच उत्तर देतात, 'मी फक्त माझं कर्तव्य करीत आहे,माझी जबाबदारी पार पाडत आहे.'

#Sudhir Mungantiwar...

#By Your Sister's Love ? Sudhir Mungantiwar...

     🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹