News@रेती तस्करी...
Gadchandur : राजुरा तालुक्यातील पवनी नाल्यातून गडचांदूर येथील काही रेती तस्कर भरदिवसा व विशेषतः रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर द्वारे रेती चोरून आणत आहे.आणि जास्त दराने विक्री करत आहे.या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज असताना राजुरा व गडचांदूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने कमालीची डोळेझाक केल्याचे चित्र असून मैत्रीपूर्ण संंबंध प्रस्थापित केल्याने रेती तस्करांना मोकळे रान उपलब्ध करून दिल्याचे खळबळजनक आरोप होत आहेत.जिल्ह्यात विविध ठिकाणी रेती तस्करांवर कारवाई होत असताना येथे कारवाई शून्य का ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.पावसाळा संपताच रेती तस्कर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले.मात्र,कारवाई करणारे गार झोपेत असल्याचे मत व्यक्त होत आहेत.Sand Smuggling.
औद्योगिक शहराच्या नावाने प्रसिद्ध गडचांदूर शहरात व लगतच्या गावखेड्यात नाना प्रकारे बांंधकाम सुरू आहेत.यामुळे रेतीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.माहितीनूसार सध्यातरी रेती घाट सुरू नसल्याने अवैध रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असून अवाच्या सव्वा दराने रेतीची घरपोच विक्री सुरू आहेत. मिळेल त्या ठिकाणावरून राजरोसपणे हजारो ब्रास रेती उत्खनन करून नदी-नाल्यांना भगदाड पाडले जात आहे ? निमणी-बाखर्डी, कुकुडसाथ-अंबुजा फाटा मार्गे पवनी नाल्याची रेती ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून गडचांदूर व परिसरातील गावात विक्री केली जात असल्याचे दृश्य नागरिक उघड्या डोळ्यांनी दररोज पाहतात.मात्र,पोलीस विभाग,मंडळ अधिकारी,तलाठी,यांना हे दिसत नसेल का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आता तहसीलदार यांनीच याकडे लक्ष देऊन पवनी नाल्यावरून गडचांदूर व परिसरात सुरू असलेल्या रेती तस्करीवर अंकुश लावण्यासाठी पावले उचलावीत,अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.आता यासंदर्भात सकारात्मक काही घडते का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
#Sand smuggling news...
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸