News@रेती तस्करी...
Chandrapur : घुग्घुस वर्धा नदीच्या चिंचोली घाट परिसरात रात्रीच्या सुमारास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच महसूल विभागाच्या पथकाने 6 नोव्हेंबरच्या मध्यरात्री धाड टाकून 5 ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली आहे.या कारवाईमुळे अवैधरीत्या रेती तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले असून कोरपना तालुक्यातील विविध घाटांवरून अशाच प्रकारे अवैधरीत्या रेतीच उपसा व वाहतूक सुरू आहे. असे असताना मात्र,याठिकाणी कारवाई होताना दिसत नाही ? सदरची कारवाई चंद्रपूरचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार,मंडळाधिकारी प्रकाश सुर्वे,तलाठी नवनाथ गोडघासे,श्याम खरात,अनूप वगारे यांनी केली असून सुमारे 6.5 लाख रुपयांचा दंड यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे कळते.
#Revenue Department Action Against 5 Tractors Smuggling Illegal Sand...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹