News@Crime...
Chandrapur : चंद्रपूर येथे एका युवकाने कॅश ऑन डिलिव्हरीच्या नावाखाली नवी युक्ती वापरत डिलिव्हरी बॉयची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार 31 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे.शहरातील ई-कार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा चेतन सोनवणे या युवकाने फ्लिपकार्ट कंपनी कडून एका कस्टमरला मोबाईल डिलिव्हर करायचा होता,त्या मोबाईलच्या पॅकिंगमध्ये दिल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकावर चेतनने कॉल करीत एकोरी वार्ड येथे कस्टमरने सदर मोबाईलची डिलिव्हरी घेतली.मात्र मोबाईल पेमेंट म्हणून कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय असल्याने कस्टमरने चेतनला ऑनलाइन पेमेंट केला असा स्क्रीनशॉट पाठविला.
2 ते 3 तास झाल्यावर सुद्धा मोबाईलचे 24 हजार 116रुपये कंपनीच्या खात्यात जमा झाले नसल्याने चेतनने कस्टमरला कॉल केला असता त्याने पुन्हा पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवला.मात्र,पेमेंट कंपनीच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे कस्टमर साद शेख याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर चेतनने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनात फसवणूकीची तक्रार दिली.कस्टमर साद शेख याने चेतनला पेमेंटचा फेक स्क्रीन शॉट पाठवला,अशी खात्री पोलिसांच्या तपासात झाली.पोलिसांनी आरोपी साद शेखवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सदर प्रकरण तांत्रिक दृष्ट्या क्लिष्ट स्वरूपाचे असल्याने याचा तपास चंद्रपूर शहर सायबर विभागाकडे देण्यात आला.
सायबर विभागाने आरोपी साद शेख यांची संपूर्ण माहिती काढली असता तो अहेरी तालुका जिल्हा गडचिरोली येथील असल्याचे स्पष्ट झाले,शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे यांनी अहेरी गाठून सापळा रचला व आरोपी साद शेखला अटक केली.आरोपी साद शेख हा उच्चशिक्षित तरूण आहे,त्याने टेक्निकल विभागातून बीसीएचे शिक्षण घेतले आहे.मात्र,त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग गुन्हेगार क्षेत्रासाठी केला.वर्षभरापूर्वी सादने चंद्रपूर शहरातील एका मोबाईल शॉपमध्ये 18 हजार रुपयांचा पेमेंटचा फेक स्क्रीनशॉट पाठवीत फसवणूक केली होती.काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित ज्वेलर्स मधून 57 हजार रुपयांचा फेक स्क्रीनशॉट पाठवीत त्यांची सुद्धा आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने अजून किती नागरिकांसोबत अशी फसवणूक केली आहे.याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.
#A Case of Online Cyber Fraud...
#Online Cyber Fraud Cases...
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸