MPDA Act Chandrapur : एमपीडीए कायदाअंतर्गत चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांचा दणका.

News@Crime....

      Chandrapur : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सक्रिय झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस रिना जनबंधू,यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर,दुखापत करणारा व्यक्ती नामे अमोल आदेश ईलमकर वय 23 रा.समतानगर वार्ड क्रं.6 दुर्गापूर,याच्यावर पो.स्टे.दुर्गापूर, रामनगर,बल्लारशाह,घुग्घुस येथे चोरी,घरफोडी, खुनाचा प्रयत्न,अश्लिल शब्दात शिवीगाळ, दुखापत आणि शस्त्रअधिनियम अंतर्गत एकूण 20 गुन्हे दाखल असून त्याची परीसरात दहशत आहे.

      त्याने सामान्य जनतेत दहशत निर्माण केली असून त्याने गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही आरोपी कायद्याला जुमानत नसल्याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेवून सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले,औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती(व्हिडीयो पारेट्स)वाळू तस्कर अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्तींच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियय सन.1981(सुधारणा 2009,2015)अन्वये प्रस्ताव तयार करून विनय गौडा जी.सी.सी.भा. प्र.से.जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे सादर केला असता,त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवून प्रस्तावित इसम नामे अमोल आदेश ईलमकर,यास नमूद कायद्यांगर्त 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याबाबत 3 आक्टोबर 2024 रोजी आदेश पारीत करण्यात आले होते.

  परंतू सदर हद्दपार इसम हा मिळून न आल्याने सदर इसमाचा शोध घेवून त्याला 5 नोव्हेंबर 2024 रोजी ताब्यात घेवून त्याला मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.आता पर्यंत सन 2024 मध्ये पोलीस अधीक्षक यांनी 3 कुख्यात गुन्हेगारांवर MPDA कायद्याआंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनात सुधाकर यादव उविपोअ.चंद्रपूर,नयोमी साटम सहायक पोलीस अधिक्षक तथा उविपोअधि वरोरा,महेश कोंडावार पोलीस निरीक्षक LCB चंद्रपूर तसेच ठाणेदार पो.स्टे.रामनगर आसिफराजा शेख, यांनी कारवाई केली आहे.

        'नेमका काय आहे एमपीडीए कायदा ?'

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा,हातभट्टीवाले तसेच औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्या करीता एपीडीए(MPDA)कायदा करण्यात आला.यात आरोपीला एका वर्षासाठी तत्काळ स्थानबध्द(तुरूंगवास)करण्यात येते.

#Chandrapur Crime Report...

#MPDA Act Chandrapur...

   🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸