News@विधानसभेचा रणसंग्राम...
𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞 : राजुरा विधानसभेत महायुती भाजपचे उमेदवार देवराव(दादा) भोंगळ यांचा प्रचार झंझावात पहायला मिळत असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. दरम्यान 12 नोव्हेंबर रोजी स्वतःदेवराव भोंगळे, यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह गडचांदूर शहरातील विविध प्रभाग तसेच मार्केट परीसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.अनेक जागी 'डोअर टू डोअर' प्रचार करून मतदारांना त्यांच्या बोधचिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मताधिक्याने विजयी करण्याची विनंती केली. दादा म्हणाले की,गडचांदुरकरांचा अप्रतिम प्रतिसाद पाहून मी अक्षरशः भारावून गेलो, भाजपा व मित्रपक्ष महायुतीच्या रुपाने यंदा राजुरा विधानसभा मतदारसंघातील जनता 'कमळ' फुलवण्यासाठी तत्पर झाली असून फक्त येत्या 20 तारखेची वाट पहात असल्याचे दादा म्हणाले.मागील 2 वर्षांपासून ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मीनं या भागातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली आहेत.या मतदार संघातील जनतेने देखील मला तितकेच प्रेम व आशीर्वाद दिले आहेत.जनतेच्या या प्रेमाची उतराई या जन्मात तरी होणे शक्य नाही.त्यामुळे या जनतेची आजन्म सेवा करण्याचा माझा संकल्प आहे. पुढील 5 वर्षे राजुरा विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी,अशी विनंती दादांनी गडचांदूरकरांना केली आहेत. दरम्यान दादांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.त्या सर्व नवयुवकांचे भाजप परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आणि सर्व उर्जावान कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घ्यावी,असे आवाहनही दादांनी त्यांना केले.यावेळी माझ्या समवेत तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरूण डोहे,जेष्ठ नेते महेशजी शर्मा, हरीश घोरे,गोपाल मालपाणी,शंकर आपुरकर, विश्वंभर झाम,राकेश अरोरा,रोहन काकडे, विजयालक्ष्मी डोहे,रंजना मडावी,शितल धोटे, दिपांजली मंथनवार,सपना नमिता बिस्वास, अपर्णा उपलेंचवार,अर्चना भोंगळे यांच्यासह भाजप व महायुतीचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#MaharashtraVidhansabha Election 2024...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹