Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी...

News@विधानसभेचा रणसंग्राम...

       Gadchandur : प्रचार संपायला 4,5 दिवस उरल्याने प्रचाराचा धुरळा उडत आहे.विविध पक्षाचे नेते,कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जीवाची काशी करत असल्याचे चित्र आहेत.खऱ्या अर्थाने आता निवडणुकीत रंगत चढली असून विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे.डोअर टु डोअर मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. अशातच महायुती भाजपचे उमेदवार देवरावदादा भोंगळे यांची सहचारिणी 'सौ. अर्चनाताई देवराव भोंगळे' व महिला टीम मैदानात उतरून दादांच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहेत.      गडचांदूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा तथा जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे,यांची गोंडपिपरी, राजुरा,कोरपना,जिवती तालुका ग्रामीण सर्कल निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने डोहेताई सुद्धा सर्कलमधील सर्व गावखेडे अक्षरशः पिंजून काढत आहे.त्या गडचांदूर शहर व ग्रामीण भागातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन देवराव दादांना भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.अर्चनाताई,ह्या गडचांदूर येथील त्यांच्या सहकारी डोहेताई व त्यांच्या महिलांची ॲक्टीव टीमसह दररोज प्रचार करीत असून कधी गडचांदूर शहर तर कधी ग्रामीण भागात त्यांचा दौरा असतो आहे.   या प्रचारात पदयात्रा,बैठका,कॉर्नरसभा तसेच गृहभेटींचा समावेश आहे.ही टीम घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधतात,त्यांच्या समस्या जाणून घेतात.थेट भेटीला येत असल्याने गावकरी महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.मागील दोन वर्षापासून विविध माध्यमातून सतत लोकांच्या सेवेत असलेले देवरावदादा विधानसभा क्षेत्रातील घरोघरी पोहोचल्यांने महिला या टीमचे मोठ्या उत्साहात स्वागत करीत आहे.अगदी मन मोकळेपणाने महिला संवाद साधत असल्याचे दिसून येत आहेत.सध्या महिलांकडून दादांचा जोरदार प्रचार सुरू असून लाडक्या बहिणींकडून सुद्धा या महिलांना भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

#Maharashtra Vidhansabha Election 2024...

    🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸