News@विधानसभेचा रणसंग्राम...
Gadchandur : शेतकरी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असून राजुरा विधानसभा क्षेत्रात युवकांचे आयकॉन ॲड.दीपक चटप यांच्या पुढाकारात युवकांची फळी तयार करून जिल्हा परिषद क्षेत्र निहाय दौरा सुरू आहे.त्यांनी गेल्या महिन्याभरात 250 हुन अधिक गावांना भेटी दिल्या आणि जवळपास 60 कॉर्नर सभा घेतल्या आहे.गाव शहरात प्रचार फेऱ्या काढून युवक वातावरण ढवळून काढीत आहे.युवकांची टीम दररोज किमान 15 ते 20 गावांना भेटी देत असून प्रत्येक दिवसाला 2 ते 3 हजार लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्याचे दिसून येत आहेत.
'काय म्हणाले ॲड.दीपक चटप'
ॲड.दीपक चटप यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी संघटनेत केवळ वयोवृद्ध असतात आणि युवक दिसत नाही ! ही विरोधकांची टीका असायची,युवा परिवर्तन दौऱ्यातील संघटनेतील युवकांची लक्षणीय संख्या बघता, त्यांच्या या टिकेला आता जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे ? गेल्या 5 वर्षात कोणताही नवा उद्योग राजुरा क्षेत्रात आलेला नाही ! हे विद्यमान आमदाराचे अपयश,या प्रचार फेरीत अधोरेखित केले जात आहे.वामनराव चटप निवडून आल्यास 'स्थानिक' या शब्दाची व्याख्या बदलून रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य देणे,युवक संसाधन केंद्राची निर्मिती करणे, युवकांच्या शैक्षणिक कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात वाचनालय व अभ्यासिकांची निर्मिती करणे आधी मुद्दे प्रचारात चर्चिले जात असून नव्या पिढीत देखील आता वामनरावांची मोठी क्रेझ दिसून येत असल्याचे ॲड.दीपक यांचे म्हणणे आहे.वामनरावांनी आमदार असताना राज्याचे विधिमंडळ सभागृह दणानून सोडले, उत्कृष्ट संसद पटू पारितोषिकाचे मानकरी ठरले, यांच्या काळात 260 पुल 450 ग्रामीण भागातल्या रस्त्यांची निर्मिती झाली.
आदिवासी बहुल डोंगरदऱ्यात वसलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम झाले.मात्र गेल्या पंधरा वर्षापासून वामनराव सत्तेत नसताना कोणतेही भरीव काम सत्ताधारी आमदारांनी केलेले नव्या पिढीला दिसत नाही.युवकांमध्ये विद्यमान आमदारांविषयी प्रचंड निराशा आहे.भाजप उमेदवाराने बाहेरील विधानसभा क्षेत्रातून युवा मुलं बोलावली असल्यामुळे स्थानिक मुलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे आता राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना अशी थेट लढत होणार असे स्पष्ट असून,या पार्श्वभूमीवर युवकांच्या समस्यांची जाण असणारा अभ्यासू लोकनेता म्हणून वामनराव चटप यांना युवकांची पसंती असल्याचे मत ॲड.दीपक चटप यांनी व्यक्त केले आहेत.
#Maharashtra Vidhansabha Election 2024...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹