News@Illegal Liquor....
Korpana : विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रिना जनबंंधु,यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,यांनी पथके तयार करून जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाईची मालिकाच सुरू केली आहे.याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावरील परसोडा SST चेक पोस्ट येथे अवैध देशी दारू वाहतूक करणारे वाहन व त्यामधील बनावट देशी दारूच्या 485 पेट्या जप्त केल्या आहे.11 नोव्हेंबर रोजी LCB चे पथक सायंकाळच्या सुमारास कोरपना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असताना गुप्त माहिती मिळाली की,MH/40/AK/4114,या क्रमांकाच्या आयशर वाहनातून देशी दारूच्या पेट्या आणल्या जात आहेत.आणि वाहन क्र. MH/32/AX/1126 महेंद्रा एक्सयुव्ही 700,या कंपनीची गाडी आयशर समोर पायलेटींग करणार आहेत.अशा माहितीवरून LCB अधिकार्यांचे वेगवेगळे पथक तयार करून खाजगी वाहनाने नमूद वाहनाचा शोध करीत असताना कोरपना-अदिलाबाद हायवे मार्गावर एक आयशर वाहन दिसला.नमूद वाहनाचा पाठलाग करून सदरचे वाहन परसोडा SST चेकपोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर,RTO विभाग,पोलीस विभाग व महसूल विभाग,येथील अधिकारी व स्टॉफच्या मदतीने नाकाबंदी करून पकडून ताब्यात घेतले.
नमूद वाहन चालक आकाश देवीदास भोसकर वयवर्ष 30 रा.शास्त्री वॉर्ड हिंगणघाट व सहचालक अजय रामदास मुळे वयवर्ष 48 रा. गौतम वॉर्ड हिंगणघाट,यांच्या ताब्यातील एक आयशर वाहन आणि(बारदाना)पोत्याच्या बंडलांखाली लपवून ठेवलेल्या संत्रा देशी दारूच्या 17 लाखांच्या 485 पेट्या व वाहन, असा एकूण 32 लाख,7 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त दारूची तपासणी करून बनावट असल्याचे अभिप्राय उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाल्यानंतर कोरपना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनात LCB,उत्पादन शुल्क विभाग,RTO विभाग व महसूल विभाग चंद्रपूर,यांच्या उपस्थितीत संयुक्तरित्या करण्यात आली आहे.सदर बनावट दारू गडचिरोली येथे नेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
#Local Crime Branch Chandrapur..
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹