News@Crime...
Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रोव्हिशन,जुगार रेड,सुगंधीत तंबाखू तसेच इतरही अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहेत.दरम्यान 5 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलिंगवर असताना गोपनीय माहिती मिळाली की,रयतवारी कॉलरी येथील रहिवासी अमर गुप्ता,हा त्याच्या किराणा दुकानामागील गोडाऊन लगत एका टाटा ओमनी वाहनात पांढर्या रंगाच्या प्लास्टिक चुंगड्यांमध्ये भरलेला सुगंधित तंबाखू दुर्गापूर येथील महिला व त्याच्या चालक टाटा एस वाहनात भरत आहे.
अशा खबरेवरून सदर ठिकाणी धाड टाकून प्लास्टिक चुंगड्यांची तपासणी केली असता एकूण 1,00,450 रुपयांच्या सुगंधीत तंबाखूचा साठा मिळून आला.अमरजित ध्रुवप्रसाद गुप्ता रा. रयतवारी कॉलरी चंद्रपूर,तसेच रक्षा ठक्कर व चालकाला मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,ययांच्या नेतृत्वात पोउनि.विनोद मुस्ले,पोह.सतीश अवथरे, नापोशि.संतोष येलपुलवार,पोशि.गोपाल आतकुलवार,पोशि.गोपीनाथ नरोटे यांनी केली आहे.
#Illegal Flavored Tobacco Case...
#Arrested in Case of Illegal Flavored Tobacco in Ryatwari Chandrapur...
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸