News@Wagh Nakh...
Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे करणाऱ्यांविरूद्ध धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने सुरू आहे.त्या अनुषंगने स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात LCB चे एक पथक अवैध धंद्यांची माहिती काढून,त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित होते. दरम्यान सदर पथकाला गोपनिय माहिती मिळाली की,काही इसमांची टोळी वाघ,या वन्यप्राण्याची नखे विक्री करण्यासाठी चंद्रपूर येथील गिरीराज हॉटेलच्या समोर येणार आहे. नमुदचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर माहिती LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना कळवून त्यांच्या आदेशान्वये कोर्ट समोरील गिरीराज हॉटेल,येथे सापळा रचून वाघनखे विक्री करण्यासाठी आणलेल्या 2 जणांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून 2 नग वाघनखे जप्त करण्यात आली.
नंदकिशोर साहेबराव पिंपळे वयवर्ष 51,रा. सिव्हील लाईल रामनगर चंद्रपुर,रविंद्र शिवचंद्र बोरकर वयवर्ष 65,रा.नगीनाबाग चंद्रपूर या आरोपींना अटक करून वाघनखांसह पुढील कार्यवाहीसाठी सहाय्यक वनसंरक्षक,वन विभाग चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,यांच्या नेतृत्वात पोउनि.विनोद भुरले, सफौ.स्वामीदास चालेकर,पोह.नितीन कुरेकार,पोह.दिनेश अराडे,पोअं.प्रशांत नागोसे यांनी केली आहे.
#Tiger nails confiscation in Chandrapur...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹