Sanjay Gandhi Niradhar Yojna : संजय गांधी निराधार योजना...

News@निराधार योजना...

              Gadchandur : संजय गांधी निराधार योजनेअंर्तगत लाभार्थांना देण्यात येणारे अनुदान मागील जवळपास 6,7 महिन्यांपासून काही लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने ऐन दिवाळीत निराधार नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यांना स्वाभिमानाचे जीवन जगता यावे,या उदांत हेतूने संजय गांधी निराधार योजना शासनाने सुरू केली.मात्र, कोरपना तालुक्यात संबंधितांकडून याला हरताळ फासला जात आहेत ? रखडलेल्या अनुदानाची रक्कम तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी,अशी मागणी गडचांदूर भाजपचे शहराध्यक्ष,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा गडचांदूर न.प.चे नगरसेवक अरविंद डोहे यांनी अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादीसह तहसीलदार कोरपना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हाधिकारी यांनीही निवेदन पठवण्यात आले आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojna.

           निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे.निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या पैशांचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येते. अनेक वयोवृद्ध,अपंग व्यक्ती तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.मात्र,येथील कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक उत्तर मिळणे तर सोडाच त्यांना विविध प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे आरोप होत आहेत.मागील अंदाजे 6 ते 7 महिन्यापासून काही लाभार्थी अनुदानापासून वंचित असल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहेत.तत्काळ अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करून त्यांची दिवाळी गोड करावी,अशी मागणी डोहे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांनाही निवेदन पाठवण्यात आले असून यावर पुढे काय घडते याकडे लक्ष लागले आहे.

                'डोहे यांनी काय केले आवाहन.'(अरविंद डोहे,संजय गांधी निराधार योजना सदस्य,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा गडचांदूर नगर परिषद नगरसेवक.)

          मोबाईल नंबर :- 9850485470

#Sanjay Gandhi Niradhar Yojna...

  🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹