Online Bogus Voter Registration Case : ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी प्रकरण...

News@Bogus Matdar...

         Gadchandur : सध्या राजुरा विधानसभा मतदार संघात ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे.या प्रकरणी योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. सदर बाब अत्यंत गंभीर असून योग्य चौकशी झालीच तर खरे चित्र समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे असताना मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे तसेच बोगस मतदार नोंदणी प्रकरणी गडचांदूर येथील सुधीरभाऊ सेवा केंद्र कार्यालयाला टार्गेट करून विरोधक बिनबुडाचे आरोप लावून नाहक बदनामी करत असल्याची संतप्त भावना भाजपच्या मंडळींनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एक आडिओ क्लिप वायरल करण्यात आली आहे.

      या क्लिपमध्ये ज्या व्यक्ती सोबतचे संभाषण आहे,तो व्यक्ती गडचांदूर येथील सुधीरभाऊ सेवा केंद्र कार्यालयात काम करत नाही. समोरची व्यक्ती त्याच्याकडून सुधीरभाऊ सेवा केंद्र,हे नाव वदवून घेत असल्याचे संभाषणा वरून स्पष्ट होते.जी व्यक्ती कधीच या कार्यालयात फिरकली नाही,त्याला काय माहीत सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा गडचांदूर भाजपचे अधिकृत संपर्क कार्यालय कोणते ? विरोधकांनी परिपूर्ण माहिती घेऊन क्लिप वायरल करणे गरजेचे होते.मात्र,असे झालेले दिसत नसल्याची खंत व्यक्त करत भाजपने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी, मतदार यादीतून बोगस मतदार वगळण्यात यावे,बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्या टोळी विरोधात तसेच सुधीरभाऊ सेवा केंद्र कार्यालयाची बदनामीकारक ऑडिओ क्लिप वयरल करणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाई करावी अशी मागणी गडचांदूर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.याविषयी ठाणेदार शिवाजी कदम,यांना निवेदन देण्यात आले आहे.

 निवडणूक आयोगाने नवीन मतदार ऑनलाईन नोंदणीसाठी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंतची मुद्दत दिली होती.त्या दरम्यान काही अज्ञात टोळीने कोरपना तालुक्यात मोठ्या संख्येने बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी केल्याचे विविध माध्यमातून कळते.ही बाब गंभीर असून जर मतदार यादीत बोगस मतदारांची नावे समाविष्ट राहीली तर होणारी निवडणूक पारदर्शकपणे होणार नाही.यासाठी मतदार वगळण्यात यावे,आणि ज्यांनी हे कृत्य केले, त्याची सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी भाजप तथा सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कार्यालय गडचांदूरतर्फे करण्यात आली आहे.निवेदन देताना भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार,महेश शर्मा,गोपाल मालपाणी,शंकर आपूरकर,राकेश अरोरा,हरिश घोरे,गणपत बुरडकर,आरविंद कोरे,सतीश आत्राम,देवीदास पेंदोर,सत्यदेव शर्मा,सोमेश्वर सोनटक्के,इतरांची प्रमुखाने उपस्थिती होती. सदर प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत असताना पोलिसांनी त्या आडिओ क्लिपमधील संबंधित व्यक्तींना बोलावून समोरासमोर विचारले तर 'दूध का दूध,पाणी का पाणी' व्हायला वेळ लागणार नाही,असे मत व्यक्त होत आहे.आता पोलिसांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

#News BJP Gadchandur...

#Online Bogus Voter Registration case...

    🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹