News@LCB...
Chandrapur : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी,कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडून सर्व पोलीस स्टॉफला निर्देश प्राप्त झाल्याने अवैध धंद्यावर कारवाई सुरू आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करून धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे.दरम्यान 23 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलिंगवर असताना,पथकाला गोपनिय माहीती मिळाली की,दत्तनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी शिवम सतीश बैस वयवर्ष 26,हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी तलवार बाळगून आहे.
या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सितारा हॉटेल बापट समोरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केली.आरोपीवर रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सपोनि.विनोद भुरले,नापोअ.संतोष येलपूलवार,पोअ.गोपाल आतकुलवार,गोपीनाथ नरोटे यांनी केली आहे.
#Local Crime Branch Chandrapur...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹