News@Illegal Liquor...
Chandrapur : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB)चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करून जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरूवात केली आहे.दरम्यान 28 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा चूनारा येथील आरोपी अनीलसिंग अदबसिंग जुनी वयवर्ष 30 याच्या घरी जाऊन घर झडती घेतली असता 54 पेट्या देशी दारू किंमत 1 लाख,89 हजार,8 पेट्या विदेशी दारू किंमत 66 हजार 460,असा एकूण 62 पेट्या देशी-विदेशी दारू किंमत 2 लाख,55 हजार 460 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.पोलीस स्टेशन वरोरा येथे अप.क्र.759/ 2024 कलम 65(E)अन्वये गुन्हा दाखल करून सदर आरोपीस मुद्देमाल वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,पोउनि.विनोद भुरले,स.फौ. स्वामिदास चालेकार,धनराज करकाडे,पोह. नितीन कुरेकर,अजय बागेसर,पोअं.शशांक बदामवर यांनी केली आहे.
#Illegal liquor...
#Local Crime Branch Chandrapur Action...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹