Illegal Liquor Smuggling : अवैध दारू वाहतुकीवर LCB ची कारवाई...

News@Illegal Liquor...

     Chandrapur : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB)चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करून जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरूवात केली आहे.असे असताना 23 ऑक्टोबर रोजी LCB चे पथक रात्रीच्या वेळी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की,एका मालवाहू टाटा एस(TATA S)वाहनाद्वारे दारूची अवैधरीत्या वाहतूक करत विक्रीसाठी नेत आहे. Illegal Liquor Smuggling.

      या माहितीवरून नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा नाकाजवळ नाकेबंदी करण्यात आली. आणि टाटा एस वाहनाला थांबवून पाहणी केली असता सदर वाहनाच्या डाल्यात तयार केलेल्या कप्प्यात लपून ठेवलेला दारू साठा आढळून आला.देशी दारुच्या 90 ml च्या 2 हजार नीपा किंमत 70 हजार व विदेशी दारूच्या 180 ML 96 निपा किंमत 18 हजार 280,तसेच टाटा एस वाहन किंमत अंदाजे 5 लाख,असा एकूण 5 लाख,88 हजार 280 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना LCB ने ताब्यात घेतले.रामनगर पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकची तपास रामनगर पोलीस करीत आहे.               सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले,LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउनि.संतोष निंभोरकर,पोह.नितेश महात्मे, चेतन गज्जलवार,पोअं.किशोर वाकाटे,अमोल सावे,प्रफुल गारघटे,प्रमोद कोटनाके,प्रसाद गुलदांदे यांनी केली.

#Local Crime Branch Chandrapur...

#Illegal liquor smuggling...

#The local Crime Branch Arrested the Accused Who Were Transporting Illegal Liquor in Vehicles...

   🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸