Assembly Election 2024, AB Forms : एबी फॉर्म’ म्हणजे काय...?

News@AB Forms...

          Assembly Election 2024 : राजकीय घडामोडी आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पार रंगून गेला आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.यावेळी सर्वात महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे 'फॉर्म A आणि फॉर्म B' निवडणूक प्रक्रियेत याच ‘AB फॉर्म’ला अनन्यसाधारण महत्त्व असते.कारण,यामुळेच संबंधित उमेदवार हा ‘AB फॉर्म’ देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हही दिले जाते.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभा, विधानसभा,महापालिका निवडणुकांसाठी या फॉर्मला AB फॉर्म संबोधण्यात येते.मात्र,राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी त्याला AA आणि BB फॉर्म,असे संबोधण्यात येते.

        राजकीय पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना विविध कागदपत्रे आणि फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.दस्तऐवजांमध्ये नागरिकत्व,वय व जात(जर ते राखीव जागे वरून निवडणूक लढवत असतील तर),तसेच फौजदारी प्रकरणे असल्यास उमेदवार आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची मालमत्ता आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.यातीलच सर्वांत महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे फॉर्म A आणि फॉर्म B.या 2 फॉर्मला एकत्रितपणे ‘AB फॉर्म’ म्हणून ओळखले जाते.हे फॉर्म सिद्ध करतात की, राजकीय पक्षाने तिकीट वितरणासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे आणि उमेदवाराने त्या व्यक्तीकडून विशिष्ट मतदार संघासाठी तिकीट मिळविले आहे.

                   'फॉर्म A म्हणजे काय ?'

   हा ‘मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्य राजकीय पक्ष’ किंवा ‘नोंदणीकृत राजकीय पक्षा’कडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे सांगणारा संवाद आहे.हा फॉर्म राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाकडून येतो; ज्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचा शिक्का असणे आवश्यक असते. फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरीही आवश्यक असते. पक्षाकडून दिल्या जाणार्‍या ‘फॉर्म A’ मध्ये उमेदवाराचे नाव,त्यांचे पक्षातील पद व चिन्ह, यांची माहिती असते.अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो.त्यामुळे सर्व कागदपत्रे योग्य असणे आवश्यक असते.अर्ज बाद झाल्यास पक्षाने जाहीर केलेला उमेदवार निवडणुकीतून बाहेर देखील जाऊ शकतो.

                    'फॉर्म B म्हणजे काय ?'

    हा राजकीय पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्या कडून(ज्यांच्या नावाचा उल्लेख पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने जारी केलेल्या फॉर्म A मध्ये केला आहे)कडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरला केला जातो.हे पत्र रिटर्निंग ऑफिसरला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती देते,ज्याला पक्षाचे चिन्ह दिले जावे.प्राथमिक उमेदवाराचे नामांकन छाननी दरम्यान नाकारले गेल्यास चिन्ह आणि उमेदवारी वाटपासाठी पर्यायी नाव देखील पत्रात असते.फॉर्म B हा देखील प्रमाणित करतो की,ज्या व्यक्तीला अधिकृत उमेदवारी दिली गेली आहेत,तो राजकीय पक्षाचा सदस्य आहे आणि त्याचे नाव पक्षाच्या यादीमध्ये दिसते.

'इच्छुक उमेदवारांनी केलेल्या सामान्य चुका कोणत्या ?'

   अधिकाऱ्यांच्या मते,नामनिर्देशनपत्र नाकारले जाण्याची वारंवार उपस्थित होणाऱ्या कारणां पैकी एक म्हणजे AB फॉर्म आणि इतर कागदपत्रे जमा करण्यात झालेला उशीर.फॉर्म नाकारण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे प्रतिज्ञा पत्रातील काही भाग न भरलेला ठेवणे.'राष्ट्रीय  पक्षांचे फॉर्म A आणि फॉर्म B बहुतेकवेळा निर्दोष असतात आणि ते अंतीम मुदती नंतर जमा केले,तर नाकारले जातात.पिंपरी येथील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या बाबतीत असेच घडले आहे.

          दुसऱ्या प्रकरणात छाननी दरम्यान असे आढळून आले की,उमेदवाराचे प्रायोजक ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते,ते त्या मतदारसंघातील नाहीत.त्यामुळे फॉर्म नाकारण्यात आले,असे पिंपरी-चिंचवडच्या उपनिवडणूक अधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,काही वेळा राजकीय पक्ष एकापेक्षा जास्त उमेदवारांना B फॉर्म देतात; ज्यामुळे प्रकरणे गुंतागुंतीची होतात.'अशा प्रकरणांमध्ये एक फॉर्म काढावा लागतो.दोन उमेदवारांपैकी एकाला त्याचे नाव पर्याय म्हणून ठेवण्यास सांगितले जाऊ शकते,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

#Assembly Election 2024...

#AB Forms...

#What are AB Forms & Why they are Crucial...

  🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸