News@POCSO Act...
Chandrapur : जिवती पोलीस स्टेशन हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्न करतो म्हणून फुस लावून पळवून नेवून तिच्याशी जबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन जिवती येथे सन 2020 मध्ये कलम 376,376(2),(N),(J),506 भादंवि सहकलम 4,5(1)व 6,लैंगिक गुन्ह्या पासून बालक संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंदविण्यात येवून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेखा काळे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.
22 ऑक्टोबर 2024 रोजी कोर्ट विद्यमान श्री अ.व्हि.दिक्षीत,विशेष सत्र न्यायाधीश चंद्रपूर, यांच्या न्यायालयात 'त्या' 21 वर्षीय आरोपीला 20 वर्ष कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहेत.सदर गुन्ह्यात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा.सरकारी अभियोक्ता श्री डी.व्ही.महाजन आणि पैरवी अधिकारी म्हणून पोअं/1117 दिनेश गरमडे पोस्टे जिवती,यांनी कामगिरी बजावली आहे.
#POCSO Crime...
#Accused in POCSO Crime Sentenced to 20 Years Imprisonmnent...
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹