News@प्रश्नयुक्त संभ्रमता... Gadchandur:कोरपना तालुक्यातील गडचांदूर -भोयगाव मार्गावरील लखमापूर जवळील 'धुनकी' शिवारातील जमिनीवर मागिल अंदाजे 3 महिन्यापासून मुरूम,दगडाचे उत्खनन सुरू आहे.याठिकाणी तलाव की शासकीय गायरान जमीन ? असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले असून नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.संबंधित विभागाने यासंदर्भातील संभ्रम दूर करावा अशी मागणी होत आहे.प्राप्त माहहितीनुसार पाटबंधारे विभागाकडे याची तलाव म्हणून नोंद नसताना याठिकाणी तलाव खोलीकरण व गाळ उपसा दाखवून त्या जमिनीतून मोठ्याप्रमाणात मुरूम,दगडाचे उत्खनन होताना दिसून येत आहे.या गौण खनिज संपत्तीचा वापर राष्ट्रीय महामार्गच्या कामासाठी होत असून आसन {खु.}ते गडचांदूरपर्यंत मुरूम,दगडाचा वापर केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सदर गाव व परिसरातील काही जुन्या जाणत्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याठिकाणी तलाव आणि त्यामध्ये गाळ नसल्याने उत्खनन क्षेत्रात चुनखडी दगड लागल्याने स्थानिकांना याचा कोणताच लाभ होणार नसल्याचे म्हटले आहे.याठिकाणी शासनाची दिशाभूल करत चुकीच्या पद्धतीने सिमाकन,पंचनामे दाखवत व शासनाच्या गौण खनिज स्वामित्वधन उत्खनन करीत असल्याची ओरड नागरीकांच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे.असे असताना मात्र,त्या क्षेत्रात पायभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणाऱ्या धोरणाला तिलांजली देत मुरूम पोखरून दगड उघडे पाडण्याचा सपाटा लावत राष्ट्रीय कार्यात सहभाग म्हणत पायाभूत सुविधा देण्याऐवजी भविष्यात पाणी संचयन होणार नाही,असे कार्य जोमात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सिमांकन व प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करणारे अधिकारी,तलाव नसताना गायरान जमिनीच्या उत्खनन सिमांकन करू देणाऱ्या अहवालावरच नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे ? कदाचित ठेकेदाराने संबंधितांशी संपर्क साधून आपल्या सोयीचा अहवाल तयार करून शासनाची दिशाभूल केल्याची शंका व्यक्त होता असून या उत्खनन प्रकरणी सर्वसामान्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.खरं काय आणि खोटं काय,नाला की शासकीय गायरान जमिन,याविषयी नागरिकांपुढे उभा ठाकलेला संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी धुनकी-कारवा येथे प्रत्यक्ष भेट देऊन, या भागात झालेल्या उत्खननाचे मोजमाप करून सत्यता पुढे आणावी,अशी मागणी काही सुज्ज्ञ नागरिकांसह गावकऱ्यांनी केली आहे.
#Murum Stone Excavation...
🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹