District Superintendent of Police has a gray eye on social media.सोशल मीडियावर जिल्हा पोलीस अधीक्षकांची करडी नजर.

News@social media...

         राज्यात होत असलेल्या दंगलीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये,दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण होवू नये,यासाठी जिल्हा पोलीस दल सतर्क असून जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेजवर जिल्हा पोलीस अधीक्षकांची सायबर सेलच्या पथकाद्वारे करडी नजर आहे.2 समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही याकरीता जनजागृतीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.  सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.गावांमधून पायी पेट्रोलिंग करुन,चावडीवरून ग्राउंड लेव्हलवरून पोलिसांकडून लोकांशी संपर्क करून,शांतता कमिटीच्या बैठका घेवून,मोहल्ला कमेटीच्या बैठकासह कॉर्नर बैठका घेवून व ग्राम सुरक्षा दलामार्फतही पोलीस लोकांच्या संपर्कात वून जनजागृती केली जात आहे.District Superintendent of Police has a gray eye on social media.सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल करून त्याला बळी पडणाऱ्या तरुण युवकांनाही पोलिसांकडून या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेतलं जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून गाव,शहर आणि जिल्ह्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा पोलीस दल ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे.

District Superintendent of Police has a gray eye on social media...

                       ••••••••<>•••••••

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.