Leopard attack on Wcl Durgapur mines Employee.दुर्गापुरात वेकोली कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला.

 

News@बिबट्याची दहशत
        Leopard attack.दुर्गापूर वेकोली कोळसा खाणीत कार्य आटोपून दुचाकीने घरी परतत असताना कामगारावर अचानकपणे झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.यामध्ये कामगार जखमी झाला असून सदर घटना 10 जून रोजी रात्री 11च्या सुमारास दुर्गापूर परिसरातील दर्गा व बौद्ध विहार रस्त्यावर घडल्याची माहिती आहे.विकास उपरे रा.दुर्गापूर असे जखमी कामगाराचे नाव असल्याचे कळते.त्याच्या पायवर जखम झाली आहे.या घटनेमुळे WCLवेकोलि कामगार व परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.Leopard attack on Wcl Durgapur mines Employee.
         विकास हा दुर्गापूर येथील खुल्या कोळसा खाणीत open coal mine विद्युत व यांत्रिकी विभागात कार्यरत आहे.Second shift द्वितीय पाळीत काम आटोपून एका सहकार्यासोबत वसाहतीतील आपल्या क्वाॅर्टरकडे निघाला असता उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालयाच्या काही अंतरावर दर्गा व बुद्ध विहारादरम्यान गतिरोधक असल्याने दुचाकीचा वेग कमी करताच बिबट्याने हल्ला केला.त्याने दुचाकी समोर नेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.यापुर्वी सुद्धा याच मार्गाने जाणाऱ्या दूर्गापूर रयतवारी कॉलरीत कार्यरत एका कामगारावरही बिबट्याने हल्ला केल्याचे बोलले जात आहे.सदर घटनेमुळे कामगारांमध्ये दहशत पसरली असून वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
Leopard attack on Wcl Durgapur mines Employee...
                 ••••••••••<>••••••••••
                       
                   
               मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.